esakal | कोरोनानंतर किडनीसह हृदय, मेंदूवर परिणाम; रक्त गोठल्याने एकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

कोरोनानंतर किडनीसह हृदय, मेंदूवर परिणाम; एकाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचा (coronavirus) कहर झाला होता. हजारो मृत्यू झाले. कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांच्या थेट फुफ्फुसांवर (corona affect lungs) परिणाम होत असल्याचे दिसून आले. तसेच हृदय, यकृत, किडनीसह मेंदूवर परिणाम होत असून मेडिकलमध्ये कोरोनानंतर मेंदूमध्ये रक्त गोठल्याने एका सुरक्षा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली. (one died due to blood clot after corona in nagpur)

हेही वाचा: लेखी आश्वासनानंतरचं अविनाशवर अंत्यसंस्कार; रेस्क्यू टीम दाखल

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल झाले. एकाचवेळी ९५० रूग्ण कोरोनाचे उपचार घेत असल्याचे वास्तव अनुभवले. या दरम्यान झालेल्या अभ्यासातून कोरोना विषाणूचा केवळ फुफ्फुसांवरच नव्हे तर मूत्रपिंड, यकृत, हृदय, मेंदू आणि स्वादुपिंड सारख्या मोठ्या अवयवांवर देखील परिणाम होतो.

मेडिकलमध्ये महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या पंचवीस वर्षीय कमांडोला कोरोना झाला. यानंतर दोन महिन्यांनंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. तपासणीत त्याच्या मेंदूत गोठलेले रक्त होते. काही दिवसांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ज्यांना आधीच उच्च रक्तदाब, रक्तदाब, मधुमेह असे गंभीर आजार होते. वृद्धामध्ये कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात अवयव निकामी होत असल्याचे पुढे आले. कोरोनामुळे लहान मुलांमध्ये मल्टीसिस्टम इन्फ्रामेट्री सिंड्रोम (एमआयएससी) असल्याचे दिसून आले. याचा परिणाम मुलांच्या हृदयावर होत असल्याचे बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे म्हणाले.

कोरोना पश्चात फुफ्फुसांसह मेंदू, हृदय, किडनी, यकृत आणि स्वादुपिंडांवर देखील परिणाम होतो. तथापि, या रुग्णांची संख्या कमी आहे. त्याचा प्रभाव कोविडमधून सावरल्यानंतरही दिसून येतो. रुग्णांना अवयवांशी संबंधित समस्या उद्भवू लागतात तेव्हा ते ओळखले जाऊ शकते.
-डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल, नागपूर
loading image