नागपूर - मुलीशी एकतर्फी प्रेमातून तिच्या वडिलांचा भरदुपारी दोघांनी चाकूने वार करून खून केला. ही खळबळजनक घटना बुधवारी (वय-२६) जाटतरोडी परिसरात दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुन्हेशाखेच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे.
नरेश वालदे (वय-५०, रा. इंदिरानगर) असे मृताचे नाव असून निलेश ऊर्फ नाना विनोद मेश्राम (वय-२८, रा. रामबाग), ईश्वर ऊर्फ जॉकी राजेश सोमकुंवर (वय-३४) अशी आरोपींची नावे आहेत.
निलेश कुख्यात गुंड असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश वालदे यांच्या मुलीसोबत निलेश याची पाच वर्षांपूर्वी मैत्री होती. मात्र, निलेश गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने युवतीने त्याचेशी बोलणे बंद केले. त्यानंतर ती त्याला कधीही प्रतिसाद देत नव्हती.
मात्र, निलेश सातत्याने तिच्या मागावर राहायचा. ही बाब तिने घरच्यांना सांगितल्यावर नरेश यांनी निलेशला हटकले होते. तेव्हापासून निलेश वडिलांचा राग करायचा. मंगळवारी (ता.२५) निलेश आपल्या साथीदारासह नरेश यांच्या घरी गेला होता. त्याने तिथे चांगलाच गोंधळ घातला. त्यानंतर तो तेथून निघून गेला.
आज दुपारी त्याने नरेश यांना फोन केला. त्यानंतर नरेश जाटतरोडी चौकात गेला. तिथे निलेश आणि ईश्वर हे दोघेही होते. त्यांनी नरेश यांचेशी वाद घालून त्यांच्या पोटावर, मानेवर सपासप वार करून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळविले आणि पसार झाले. ही माहिती कळताच, पोलिसांता ताफा घटनास्थळी दाखल झाला.
त्यांनी पंचनामा करीत, मृतदेह मेडिकलला रवाना केला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. प्रकरणाचा समांतर तपास गुन्हेशाखेच्या पथकाने सुरू करीत, दोघांनाही अटक करीत इमामवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.