esakal | ग्रामीण भागातील शिक्षण केवळ कागदोपत्रीच ऑनलाइन!
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागातील शिक्षण केवळ कागदोपत्रीच ऑनलाइन!

ग्रामीण भागातील शिक्षण केवळ कागदोपत्रीच ऑनलाइन!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळे (coronavirus) मागच्या सत्रापासून शाळा बंद आहे. त्यामुळे ऑनलाइन विद्यार्थ्यांना शिक्षण (Online teaching) दिले जात आहे. यंदाचेही सत्र नुकतेच सुरू झाले. शहरी भागातील शाळांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणही देण्यात येत आहे. परंतु, ग्रामीण भागात अशी कुठलीही कृती होताना दिसून (Difficulty in rural areas) येत नाही आहे. शासन व प्रशासन ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे गिरवीत असल्याचे सांगत आहे. परंतु, प्रत्यक्षात बहुतांशी शाळांमध्ये अशी कृती होत नसल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे त्याबाबतचा अहवालही तालुकास्तरावरून शिक्षण विभागाला अद्यापपर्यंतही प्राप्त झालेला नाही. (Online-Education-in-rural-areas-is-only-paperwork)

यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू झाले असून, विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद आहे. शिक्षकच शाळेमध्ये उपस्थित राहत आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या १,५३० वर शाळा असून, जवळपास ७० हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेतात. तर जवळपास ४,४०० वर शिक्षक व तितकेच शिक्षकेतर कर्मचारी येथे कार्यरत आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. यावर उपाय म्हणून शासनाने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय शोधला. याशिवाय विविध माध्यमातूनही विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. परंतु, या सर्व उपाययोजना शहरी भागात काही प्रमाणात यशस्वी ठरल्यात. ग्रामीणमध्ये आजही या पूर्णपणे अयशस्वी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: राष्ट्रवादीला काँग्रेसकडून भीती; आघाडी तुटण्याची शक्यता

याचे कारण म्हणजे ग्रामीण भागातील जि. प. शाळांमध्ये शिक्षण घेणारी मुले ही गरिबांची आहेत. त्यापैकी निम्म्यावर मुलांच्या पालकांकडे मोबाईलच नाही. ज्यांच्याकडे मोबाईल आहे, तिथे इतर भावंड असल्यामुळे त्यांना शिक्षण घेणे अवघड असल्याचे वास्तव आहे. त्यातच गत शैक्षणिक सत्रामध्ये झाले ते मागे सोडून यंदाच्या नवीन सत्रापासून शिक्षकांनी नियमित विद्यार्थ्यांचे ऑनलाइन किंवा गटाच्या माध्यमातून ऑफलाईन वर्ग घेण्याचे शिक्षण विभागाने सूचना केल्या. सोबतच दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे.

ऑफलाईन पद्धतीने शिक्षण देणे शक्य

तालुकास्तरावरून एकाही गट शिक्षणाधिकारी (बीईओ)कडून शिक्षण विभागाला सदरचा अहवाल प्राप्त झाला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तालुकास्तरावर अनेक केंद्र प्रमुख हे शिक्षकांकडून सदरचा दैनंदिन अहवाल घेत असल्याचेही शिक्षकांचे म्हणणे आहे. मोठ्या शाळा असेल तर तिथे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून एका दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत बोलाविल्यास ऑफलाईन पद्धतीने शिक्षण देणे शक्य असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: शिवसेनेला ठेवले वेटिंगवर अन् भाजप-राष्ट्रवादीचे उमेदवार संपर्कात?

...तर शैक्षणिक नुकसान टाळणे शक्य

विद्या परिषद पुणेतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘ब्रीज कोर्स’ हे कृतियुक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी उत्तम आहे. मात्र, केवळ ब्रीज कोर्स पीडीएफव्दारेच उपलब्ध झालेले आहे. ब्रीज कोर्स जर शासनाने छापील पुस्तके स्वरूपात उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांचे अध्यापन कार्य सुरळीतपणे पार पाडणे शक्य होणार आहे. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल, अशीही भावना काही शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

(Online-Education-in-rural-areas-is-only-paperwork)

loading image
go to top