Digital Arrest: ‘डिजिटल अरेस्ट’ करून माजी बॅंक अधिकाऱ्याकडून उकळले २२ लाख; ‘मनी लाँड्रिंग’च्या आरोप असल्याची बतावणी
Ex-Bank Officer Trapped in ‘Digital Arrest’ प्रकरण सायबरशी संबंधीत असल्याने ती सायबर गुन्हे पोलिसांकडे स्टेशनकडे वर्ग करण्यात आली. प्राथमिक तपासात घटनेची माहिती घेत, दोघांविरोधात गुन्हा दाखल करून रण्यात आला. दरम्यान पोलिसांनी संबंधित बॅंक खाते गोठविले असून तपास सुरू केला आहे.
नागपूर: मनी लाँड्रिंगच्या खोट्या आरोपाखाली बॅंकेच्या माजी महिला अधिकाऱ्याला पतीसह ‘डिजिटल अरेस्ट’ करीत २२ लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी दोन सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.