esakal | धक्कादायक! नागपूरच्या शासकीय रुग्णालयात केवळ १०० रेमडिसिव्हिर शिल्लक; रुग्णांचा जीव टांगणीला
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! नागपूरच्या शासकीय रुग्णालयात केवळ १०० रेमडिसिव्हिर शिल्लक; रुग्णांचा जीव टांगणीला

धक्कादायक! नागपूरच्या शासकीय रुग्णालयात केवळ १०० रेमडिसिव्हिर शिल्लक; रुग्णांचा जीव टांगणीला

sakal_logo
By
केवल जीवनतारे ः @kewalsakal

नागपूर : गेल्या चार दिवसांपूर्वी मेडिकलला केवळ दीड हजार कोव्हॅक्सिन लसींचे डोस मिळाले होते. तेही आता संपुष्टात आले असून, मेडिकलमध्ये लसीकरणासाठी गर्दी होत असल्याने नागरिकांसाठी लस उपलब्ध नसल्याचा फलक लावण्यात आला आहे.

तर मेडिकलमध्ये गंभीर संवर्गातील कोरोनाबाधितांचा आकडा फुगत असल्याने रेमडिसिव्हिरचा तुटवडा पडला आहे. अवघे १०० रेमडिसिव्हिर असल्याची माहिती पुढे आली आहे.

यामुळे मेडिकलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला आला आहे.

रेमडिसिव्हिर खरेदीच्या धोरणावर प्रशासनाने टाच आणल्यामुळे जिल्ह्यात रेमडिसिव्हिरचा तुटवडा निर्माण झाली आहे. या धोरणाचा फटका मात्र रुग्णांना बसत आहे. अनेक रुग्णालये रेमडिसिव्हिर मिळाल्यानंतरही त्याचा काळाबाजार करीत आहेत.

नुकतेच गोंदियातील एका रुग्णासाठी रेमडिसिव्हिर आवश्यक असल्याने नागपुरातून ब्लॅकमध्ये खरेदी करण्यात आल्याची माहिती एका रुग्णाच्या नातेवाईकांकडून मिळाली.

दहा हजार रुपये रुग्णाच्या नातेवाईकाने मोजले होते. मात्र मेडिकलमध्ये रेमडिसिव्हिर उपलब्ध होते. शहरात कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यामुळे अनेकांनी मेयो आणि मेडिकलमध्ये रुग्ण भरती करण्यावर भर दिला. यामुळे अखेर मेडिकलमध्ये रुग्णांची संख्या वाढली.

मेडिकलमधील रेमडिसिव्हीर संपण्याच्या मार्गावर आहे. अवघ्या १०० गोळ्या उरल्या असल्याची माहिती पुढे आली मात्र मेडिकल प्रशासनाने रेमडिसिव्हिर तत्काळ खरेदी करण्यात येतील असे कळविले.

आठवड्यात दुसऱ्यांदा लस संपुष्टात

९ एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्यासाठी कोव्हॅक्सिनचे ११ हजार ३६० डोस उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यापैकी केवळ १५०० डोस हे मेडिकलला मिळाले. ८ एप्रिल रोजी मेडिकलमधील लस संपली होती. आता पुन्हा एकदा १३ एप्रिल रोजी रात्री लस संपली.

आठवड्यात दोन वेळा लस संपल्यामुळे केंद्रशासनाकडून सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेचा फज्जा उडत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

संपादन - अथर्व महांकाळ