
नागपूर : लसीच्या तुटवड्यामुळे (vaccine shortage) सध्या लसीकरण (vaccination in nagpur) संथगतीने सुरू आहे. अनेक लसीकरण केंद्र (vaccination centers in nagpur) बंद असून काही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करण्यात आले. आतापर्यंत गेल्या पाच महिन्यांत शहरातील केवळ १६ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला. लसीकरणाच्या या संथगतीमुळे संपूर्ण शहराच्या लसीकरणाला अडीच वर्षे लागतील, अशी चर्चा आता रंगली आहे. दोन्ही डोस घेणारे नागरिक केवळ ५.४ टक्के आहेत. (only 16 percent people have take first dose in last five months nagpur)
महापालिका ४५ वर्षांवरील लसीकरणासाठी विविध उपक्रम राबवित आहे. परंतु, लसीची उपलब्धता बघता लसीकरण सध्या संथगतीने सुरू आहे. शहरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवक, दुसऱ्या ५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर, तर १ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. चौथ्या टप्प्यात १८ ते ४५ वयोगटासाठीही लसीकरण सुरू झाले. परंतु, ते अल्पकाळच ठरले. या चारही टप्प्यात गेल्या पाच महिन्यांत शहरातील ४ लाख ८९ हजार ९३६ नागरिकांनी पहिला डोस घेतला. शहराची लोकसंख्या ३० लाख असून ही टक्केवारी १६ आहे. अर्थात पाच महिन्यांत केवळ १६ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला. गेल्या काही दिवसांत लसीचा तुटवडा सुरू झाल्याने लसीकरणासाठी विविध उपक्रम सुरू असले तरी त्यावर मर्यादा आल्या आहे. परिणामी, लसीकरणाचा वेग चांगलाच मंदावला. पाच महिन्यांत १६ टक्के नागरिकांनाच लस देण्यात महापालिकेला यश आले. त्यामुळे इतर नागरिकांना लस देण्यासाठी २०२४ उजाडणार अशी चर्चा आता शहरात रंगली आहे. यावरून सोशल मीडियावरही प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहे. दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या १ लाख ६० हजार ४५५ असून टक्केवारी केवळ ५.४ आहे. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस घेण्याचा कालावधी वाढल्याने दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांच्या टक्केवारीत घट झाली आहे.
लसीकरणाची स्थिती
पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य सेवक - ४५१०० २२,८४७
फ्रंट लाईन वर्कर - ५२५०१ १८,९८०
१८ ते ४५ वयोगट - ११०००
४५ ते ६० वयोगट - १,२६,३८२ २८,२७५
विविध आजाराचे ४५ वर्षांवरील नागरिक - ८१,९७१ १७,५४४
६० वर्षांवरील सर्व नागरिक - १,७२,८४१ ७२,८०९
एकूण : ४,८९,९३६ १,६०,४५५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.