नागपुर शहर पोलिस दलात १६ टक्केच महिला

राज्यातही सारखीच परिस्थिती, विशेष प्रयत्नांची आवश्‍यकता
नागपुर शहर पोलिस दलात १६ टक्केच महिला
नागपुर शहर पोलिस दलात १६ टक्केच महिलाsakal

नागपूर : नागपूर शहर पोलिस दलात फक्त १६ टक्के महिला कर्मचारी आहेत. मंजुर पदांपैकी आणखी तीन हजार पोलिस कर्मचाऱ्यांची दलाला आवश्‍यकता आहे. महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महिला पोलिसांची भरती होणे गरजेचे आहे. मात्र, साडेआठ हजार मनुष्यबळ असणाऱ्या नागपूर पोलिस आयुक्तालयात केवळ १५२० महिला पोलिस कर्मचारी कार्यरत आहे.

उपराजधानीची सीमा आणि लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून कायदा व सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर येत आहे. त्यामुळे पोलिस दलात रिक्त पदांचा अनुशेष भरणे गरजेचे आहे. नागपूर शहर पोलिस दलात ८ हजार ८८५ पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या मंजूर असून सध्यस्थितीत ७ हजार ७७८ जण कार्यरत आहेत.

नागपुर शहर पोलिस दलात १६ टक्केच महिला
अकोला : मास्क, लस रोखेल कोरोनाचा नवीन संसर्ग!

लोकसंख्येचा ताळमेळ बसविल्यास शहर पोलिस दलात जवळपास ५ हजार पोलिस कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. यामध्येही महिला पोलिसांचा टक्का पुरुष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. येणाऱ्या काळात जवळपास ३ हजार महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश शहर पोलिस दलात होण्याची गरज निर्माण झाली आहे. महिला अत्याचाराचे गुन्हे एकीकडे वाढत असताना पोलिस खात्यात मात्र महिला पोलिसांचे प्रमाण काही वाढण्यास तयार नाही. विविध क्षेत्रांत महिलांचा टक्का वाढत असताना राज्यातील पोलिस दलात फक्त १४ टक्केच महिला कर्मचारी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

नागपुर शहर पोलिस दलात १६ टक्केच महिला
नाशिक : होर्डिंगच्या निविदा निघण्यापूर्वीच अटी- शर्ती बाहेर

राज्यात महिलांचा टक्का कमी

राज्यात दोन लाख १४ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मंजूर आहेत. मात्र, त्यापैकी दोन लाख चार हजार प्रत्यक्ष मनुष्यबळ कार्यरत आहे. एक लाख लोकसंख्येमागे १७० पोलिस कर्मचारी असे पोलिसांचे प्रमाण आहेही अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पोलिसांची संख्या सर्वांत कमी आहे. राज्यात सध्या एक लाख ७८ हजार ४१९ पुरुष पोलिस तर, महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे संख्याबळ २६,२३६ आहे. यामध्ये १७४३ महिला अधिकारी तर, २४,२०४ महिला कर्मचारी आहेत.

राज्यातील संख्याबळ

पुरुष पोलिस - १,७९ हजार, महिला पोलिस - २७,१०२

नागपुरातील संख्याबळ

पुरुष पोलिस - ५५००, महिला पोलिस - १५२०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com