नागपूर शहरात केवळ २१३ बाधित; बरे होण्याचे प्रमाण ९५.५१ टक्क्यांवर

नागपूर शहरात केवळ २१३ बाधित; बरे होण्याचे प्रमाण ९५.५१ टक्क्यांवर

नागपूर : सलग दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या (coronavirus) पाचशेपेक्षा कमी आढळून येत आहे. दीड महिन्यांपूर्वी कोरोनाबाधितांचा ३२ टक्क्यांपर्यंत पोहोचलेला दर आता पाच टक्क्यांपेक्षा खाली आला. मंगळवारी शहरात २१३ तर जिल्ह्यात अवघे ४७० नवे बाधित आढळून आल्यामुळे बाधितांचा दर ३.३३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जिल्ह्यात २४ तासांत २५ बाधितांचा मृत्यू झाला. (Only 213 corona affected in Nagpur city)

मंगळवारी (ता. २५) ८ हजार ४६५ आणि ग्रामीणमध्ये ५ हजार ६८० अशा जिल्ह्यात १४ हजार १४५ चाचण्या झाल्यात. त्यापैकी केवळ ३.३३ टक्के म्हणजेच ४७० जणांचेच अहवाल बाधित आले. यामध्ये शहरातील २१३, ग्रामीणमधील २४६ व जिल्ह्याबाहेरील ११ जणांचा समावेश आहे. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४ लाख ७२ हजार ११ वर पोचली आहे. तर दिवसभरात २५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामध्ये नागपूर शहरात ४ व ग्रामीणमध्ये १० अशा नागपूर जिल्ह्यात केवळ १४ जणांची, तर नागपूर जिल्ह्याबाहेरील ११ जणांना मृत्यू झाला.

नागपूर शहरात केवळ २१३ बाधित; बरे होण्याचे प्रमाण ९५.५१ टक्क्यांवर
एकेकाळी हसते खेळते असलेले आमचे नगर आज विरान आहे, साहेबऽऽ

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ८ हजार ८२२ वर पोचली आहे. यातील १हजार ३४७ जण हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत. दिवसभरात शहरातून ७८१ व ग्रामीणमधील १२०० असे १हजार ९८१ जण ठणठणीत होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या ४ लाख ५२ हजार ३४१ वर गेली असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५१ टक्क्यांवर पोचले आहे.मात्र ग्रामीण भागात मृत्यूचा टक्का वाढला असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी ४७० नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्या तुलनेत चार पट लोकांनी कोरोनावर मात केली. यामुळे सध्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३ हजारांपेक्षा कमी आहे.

जिल्ह्यात १०,८४८ बाधित

जिल्ह्यातील दीड महिन्यांपूर्वी ७७ हजार कोरोनाबाधितांची संख्या होती. आता बाधितांची संख्या घटून कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढताच सक्रिय कोरोनारुग्णांच्या संख्येतही मोठी घट आली आहे. आज घडीला शहरात ५ हजार ८३७ तर ग्रामीणमध्ये ५हजार ०११ असे जिल्ह्यात १० हजार ८४८ सक्रिय कोरोनाबाधित आहेत. यापैकी निम्म्यावर म्हणजेच ७ हजार ५१२ जण लक्षणे नसल्याने गृह विलगीकरणात आहेत. तर सौम्य, मध्यम व तीव्र अशी लक्षणे असले केवळ २ हजार ८६६ जण मेडिकल, मेयो, एम्ससह कोविड केअर सेंटर व खासगीत रुग्णालयात उपचार घेत आहेत.

(Only 213 corona affected in Nagpur city)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com