

Children at Risk as Adulterated Milk Trade Goes Unchecked
sakal
-बबलू जाधव
आर्णी (जि. यवतमाळ) : शहरात केमिकलमिश्रित दुधाचा काळाबाजार खुलेआम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. एकही दूध विक्रेता दुधाची कॅन घेऊन डेअरीवर दूध देण्यासाठी येताना दिसत नसताना हजारो लिटर दूध येते कुठून, असा प्रश्न निर्माण होत आहे. हजारो लिटर दुधाचा पुरवठा करण्याएवढी दुधाळ जनावरे आहेत तरी कुठे, हाही प्रश्न आहेच.