oyo hotels
sakal
नागपूर - मानवी तस्करी, बेकायदेशीर देहविक्री आणि फसवणुकीसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी ओयो, हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस आणि होम-स्टेवर कडक नियम लागू केले आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ‘ऑपरेशन शक्ती’अंतर्गत याबाबत अधिसूचना जारी केली आहे. हे नियम ११ सप्टेंबर ते ९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत लागू राहणार आहेत.