esakal | कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांचे पालकत्व स्विकारणार, फडणवीसांचे आश्वासन
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांचे पालकत्व स्विकारणार, फडणवीसांचे आश्वासन

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : कोरोना (coronavirus) काळात पालक गमवलेल्या बालकांना दत्तक घेण्याचा उपक्रम संदीप जोशी यांनी उपक्रम घेतला. त्यासाठी १०० मुलांची नोंदणी झाली आहे. त्या मुलांचे पालकत्व मी स्विकारतो. तसेच दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचा (south west nagpur assembly constitution) मी लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे या मतदारसंघातील अशा बालकांची नोंदणी करून त्यांचंही पालकत्व स्विकारेन. तसेच त्यांचा पूर्ण खर्च उचलणार असल्याचे आश्वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांनी दिले. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (union minister nitin gadkari birthday) यांच्या वाढिदिवसानिमित्त एक कार्यक्रम आय़ोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. (opposition leader devendra fadnavis will adopt 100 children who lost their parent due to corona)

हेही वाचा: ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने दिली कोरोनाला मात; कधीही पडले नाही घराबाहेर

नितीन गडकरींचं समाजाला मोठं योगदान आहे. ते कोरोना काळात त्यांनी समाजातील तळगाळातील जनतेला मदत केली. मग रेमडेसिव्हीर असो की बेड प्रत्येकवेळी गडकरी जनतेच्या पाठीशी उभे होते, असे म्हणत त्यांनी नितीन गडकरींचे कौतुक केले. तसेच डॉक्टर, परिचारिका, खासगी रुग्णालय, शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या लोकांचा सत्कार करणे गरजेचे आहे आणि तो आपण केला. या कोरोना काळामध्ये माणुसकीच्या अनेक कथा आपल्यासमोर आल्या. यामधूनच भारतीय संस्कृतीचं दर्शन होतं. ज्या लोकांनी प्रेतांवर अंत्यसंस्कार करून त्यांची विल्हेवाट लावणे हे अंत्यत महत्वाचे काम आहे. त्यांचाही सत्कार केला आहे, असेही फडणवीस म्हणाले.