पोलिस ठाण्यातून परतल्यानंतर आई म्हणाली, ‘राधिका उठ, बेटा उठ’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Out of anger the father killed his daughter Nagpur crime news

सकाळपासून तो दारू पिऊन असल्याने पत्नीला शिवीगाळ व मारहाण करीत असल्याने तक्रार द्यायला ती पोलिस ठाण्यात गेली. त्यावेळी आरोपी किशोर व मुलगी राधिका हे दोघेही बापलेक घरीच होते. पूजासोबत पोलिस घरी येताच मुलगी राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसली.

पोलिस ठाण्यातून परतल्यानंतर आई म्हणाली, ‘राधिका उठ, बेटा उठ’

टाकळघाट (जि. नागपूर) : पती-पत्नीत होणारा वाद विकोपाला गेला म्हणून ती पोलिस ठाण्यात नवऱ्याची तक्रार करायला गेली. इकडे दारू ढोसलेल्या नवऱ्याचा पोलिसांच्या भीतीने थरकाप उडाला. त्याने रागाच्या भरात पोटच्या दोन वर्षीय चिमुकलीची ब्लेडच्या पात्याने गळा कापून हत्या केली. पोलिसांना घेऊन आई घरी परतली. चिमुकल्या राधिकेचा मृतदेह पाहून तिने काळजाला पाझर फोडणारा हंबरडा फोडला. ही खळबळजनक घटना एमआयडीसी बुटीबोरी ठाण्याच्या हद्दीतील गणेशपूर येथे घडली. मृत चिमुकलीचे नाव राधिका किशोर सोयाम (वय २) तर आरोपी वडिलांचे नाव किशोर सोयाम (वय ४०) असे आहे.

किशोर हा चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून, पत्नी पूजा (वय ३०) हिच्यासोबत चार वर्षांपूर्वी प्रेमसबंधातून लग्न झाले होते. दोन वर्षीय चिमुकली राधिकासोबत एमआयडीसी बुटीबोरी येथील गणेशपूर येथे दास यांच्याकडे कुटुंब भाड्याने राहत होते. आरोपी किशोर याला दारूचे व्यसन होते. काही दिवसांपासून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय करायचा व दारू पिऊन आल्यावर पत्नी पूजाला मारहाण करायचा. ‘सोडचिठ्ठी देऊन टाक’ असे वारंवार म्हणायचा.

अधिक वाचा - खुशखबर! सोनं घ्या सोनं; भाव झाले कमी; चांदी शौकिनांचीही होणार चांदी

सोमवारी सकाळपासून तो दारू पिऊन असल्याने पत्नीला शिवीगाळ व मारहाण करीत असल्याने तक्रार द्यायला ती पोलिस ठाण्यात गेली. त्यावेळी आरोपी किशोर व मुलगी राधिका हे दोघेही बापलेक घरीच होते. पूजासोबत पोलिस घरी येताच मुलगी राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसली.

पोलिसांनी त्वरित चिमुकलीला रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आरोपी किशोर यास ताब्यात घेत नागपूर रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले असून, उपचार सुरू आहे. घटनेची एमआयडीसी पोलिसांनी नोंद करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात भास्कर मेटकर करीत आहे.

‘राधिका उठ, बेटा उठ’

पती-पत्नीच वाद झाल्यानंतर पत्नी पतीविरोधात एमआयडीसी ठाण्यात तक्रार द्यायला आली. त्यावेळी पत्नीला फोन करून ‘तुला मारील, मुलीला मारील’ अशी बतावणी करीत असताना पत्नीने ठाण्यात तक्रार दाखल केली. एमआयडीसी पोलिस पतीला ताब्यात घेण्यासाठी पूजासोबत सोबत गेले असता चिमुकली रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यानेसुद्धा आत्महत्या करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याचे चित्र दिसताच पत्नीने ‘राधिका उठ, बेटा उठ’ असे म्हणत हंबरडा फोडला व ढसाढसा रडायला लागली.

जाणून घ्या - "आई तुझा प्रॉब्लेम काय आहे?" असं विचारत अवघ्या १६ वर्षांच्या मुलीनं घेतला गळफास; हृदयद्रावक घटना

ती तक्रार द्यायला गेली नसती, तर...

राधिकाची आई पूजा व वडील किशोर दोघेही एमआयडीसी बुटीबोरी येथील वेगवेगळ्या कंपनीत मजुरीचे काम करायचे. पती पत्नीवर संशय घेत होता. दारू पिऊन आल्यावर पत्नीला त्रास द्यायचा. ‘तू मला डिओर्स देऊन टाक’ असे म्हणत कधी मारहाण सुद्धा करायचा. त्यामुळे त्रासलेल्या पत्नीने पतीविरोधात ठाण्यात तक्रार द्यायचे ठरविले असता ती ठाण्यात तक्रार द्यायला आली. आता पोलिस येईल या भीतीने पतीने पत्नीचा राग त्या निष्पाप मुलीवर काढला. तिच्या गळ्यावर ब्लेडने चिरे मारून हत्या केली. घरीच आपसी समजूत काढून एकमेकांना समजून घेतले असते तर राग शांत झाला असता, अशी परिसरात चर्चा आहे.

Web Title: Out Anger Father Killed His Daughter Nagpur Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ThaneChandrapur
go to top