

Desecration of Shiva Idol Leads to Massive Protest, Ultimatum to Police
Sakal
अड्याळ : पवनी तालुक्यातील भावड येथील शिव मंदिरातील मूर्तीची विटंबना केल्याचा प्रकार शनिवारी (ता.१७) रोजी सकाळी उघडकी आला. यातील दोषींना अटक करण्याची मागणी करत भावडपासून रविवारी (ता.१८) रोजी अड्याळ पोलिस ठाण्यावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. क्षेत्राचे आमदार नरंेद्र भोंडेकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले असून, आरोपींना अटक केली नाही, तर पोलिस मुख्यालयासमोर तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.