Nagpur News: हेल्मेट घाला, जीव वाचवा! शहरातील चार लाख दुचाकीस्वार हेल्मेटविना; वाहतूक विभागाकडून कारवाई, पाच महिन्यांत १२१ जण ठार
Nagpur Traffic : नागपूरमध्ये गेल्या पाच महिन्यांत १२१ अपघाती मृत्यू झाले असून हेल्मेटविना दुचाकी चालवणाऱ्या ४ लाखांहून अधिक वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.
नागपूर : शहरात वाहतुकीची वर्दळ वाढल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. गेल्या पाच महिन्यात अपघातात १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. असे चित्र असतानाही स्वतःच्या सुरक्षेसाठी शहरातील दुचाकीस्वार हेल्मेट घालताना दिसून येत नाही.