
नागपूर ः आठवड्याच्या सुरुवातीला कोरोनाबाधितांची संख्या तीनशेहून खाली गेली होती. मात्र, सलग तीन दिवसांपासून चारशेवर बाधित आढळून येत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी ४३० नव्या बाधितांची भर पडली. गेल्या २४ तासांत नऊ कोरोनाबळींची नोंद करण्यात आली.
जिल्ह्यात रविवार, सोमवारी कोरोनाबाधितांची संख्या तीनशेपेक्षाही कमी होती. परंतु मंगळवारी ४१८, बुधवारी ४३६ तर आज ४३० बाधित आढळून आले. एकीकडे लसीकरणाची तयारी सुरू असतानाच जिल्ह्यात सलग तीन दिवस चारशेवर बाधित आढळून आल्याने आरोग्य विभाग, महापालिकेची झोप उडाली. आज जिल्ह्यात आढळून आलेल्या ४३० बाधितांमध्ये शहरातील ३४७ रुग्ण, ग्रामीणचे ७९, जिल्हाबाहेरील ४ जणांचा समावेश आहे.
त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या ९४ हजार २७, ग्रामीण २४ हजार ९, जिल्हाबाहेरील ७४१ अशी एकूण १ लाख १८ हजार ७७७ रुग्णांवर गेली आहे. तर दिवसभऱ्यात शहरात ४, ग्रामीणला १, जिल्ह्याबाहेरील ४ असे एकूण ९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ६०३, ग्रामीण ६६३, जिल्हाबाहेरील ५५९ अशी एकूण ३ हजार ८२५ रुग्णांवर पोहचली आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४९३ बाधित कोरोनामुक्त झाले. यात शहरातील ४०१, ग्रामीणमधील ९२ जणांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या कोरोनामुक्तांची संख्या ८६ हजार ४०९ तर ग्रामीणमधील २२ हजार ६३९ पर्यंत पोहोचली. जिल्ह्यात एकूण १ लाख ९ हजार ४८ जण कोरोनामुक्त झाले. गुरूवारी कोरोनापेक्षा नव्या बाधितांची संख्या कमी होती. जिल्ह्यात सध्या ५ हजार ९०५ रुग्ण उपचार घेत आहेत. यात शहरातील ५ हजार १५ तर ग्रामीणमधील ८८९ जणांचा समावेश आहे.
संपादन : अतुल मांगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.