moneylenders
नागपूर
Nagpur News : एक लाखांवर कर्जदार सावकारी ओझ्याखाली; १२३६ सावकारांकडून १२५ कोटींचे कर्ज
आर्थिक स्थिती, रोजगार, किरकोळ व्यवसाय आणि अनौपचारिक व्यवहारांमुळे नागरिकांना तातडीच्या पैशाची गरज भासते.
- चेतन बेले
नागपूर - जिल्ह्यात अधिकृत सावकारी वाढू लागली असून चालू आर्थिक वर्षात एक हजार २३६ परवानाधारक सावकारांकडून तब्बल एक लाख १८३ जणांना १२५ कोटी ३६ लाख ७३ हजारांचे कर्ज दिले आहे. यावरून जिल्ह्यात सावकारीचा फास किती घट्ट होत आहे हे स्पष्ट होते.

