
नागपूर : शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी मनरेगातून सिंचन विहिरींची कामे करण्यात येते. यासाठी गत १३ वर्षांत ९ हजार २८९ प्रस्ताव शेतकऱ्यांकडून मनरेगाला प्राप्त झाले. मात्र, या विहिरींच्या कुशल कामाचा निधीच मिळाला नसल्याने अद्याप तब्बल २ हजार १५१ विहिरींच्या कामाची गती मंदावली आहे.