Nagpur News: नागपूर येथे ओयो हॉटेलमध्ये युवकाने संपवले जीवन
Nagpur Crime: नागपूरातील मनीषनगर परिसरातील ओयो हॉटेलमध्ये २६ वर्षीय उच्चशिक्षित युवकाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
नागपूर : बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मनीषनगरातील उत्कर्ष ओयो हॉटेलमधील खोलीत उच्चशिक्षित युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. मयंक गणराज कडनाके (वय २६, रा. राधाकृष्ण सोसायटी, मनीषनगर) असे मृताचे नाव आहे.