Nagpur News : रंगांचा व्यवसाय चकाकला; दोन महिन्यात ३५० कोटींचा व्यवसाय, दुकानांमध्ये गर्दी वाढली

दिवाळीत घर व प्रतिष्ठानांच्या रंगरंगोटीसाठी पेंटची मागणी वाढलेली असते
painter business shines in diwali festival 350 crores in two months marathi news
painter business shines in diwali festival 350 crores in two months marathi news sakal

नागपूर : दिवाळीत घर रंगविण्याचा लोकांचा उत्साह महागाईच्या दिवसांतही टिकून आहे. कच्चा माल, इंधन आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्याने रंगांच्या किमतीतही वाढ झालेली आहे. त्यामुळे दिवाळीतील घराच्या रंगकामाचे गणित काहीसे कोलमडले आहे. पण खिशाचा बेरंग झाला तरी चालेल, परंतु रंगांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या २ महिन्यात ३५० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल या व्यवसायात झालेली आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी अनेक इकोफ्रेंडली वस्तू बाजारात येत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून इकोक्लीन हा इकोफ्रेंडली रंग बाजारात आले आहेत. ग्राहक काही प्रमाणात या रंगांची मागणी करतात. या रंगास उग्र वास नाही. हा पाण्यामध्ये मिसळून दिला जातो. टर्पेंटाईन, रॉकेल यांच्या मिश्रणापासून तयार होणाऱ्या रंगांचा वेगळाच वास येतो.

दिवाळीत घर व प्रतिष्ठानांच्या रंगरंगोटीसाठी पेंटची मागणी वाढलेली असते. गेल्या वषीपेक्षा यंदा व्यवसायाला झळाळी आली आहे, असे पेंट व्यवसायी अफजल खान यांनी सांगितले. दिवाळीच्या दोन महिन्यात म्हणजे ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये जवळपास ४०० कोटीचा व्यवसाय होतो. हा वर्षभराच्या व्यवसायाच्या ४० टक्के आहे.

कारागीरही सापडेना

दिवाळीच्या सणात घराच्या रंगरंगोटीसाठी कारागिरांचीही मागणी असते. अनेक कारागीर फार आधीच बुक झालेले असतात. त्यामुळे अनेकांची मोठी अडचण होते.

पेंटिंग फ्रेमचा प्रकार वाढला

आतापर्यंत भिंतींना पेंट करण्याची चलन होते. आता घरातील कक्ष, हॉलची भिंत आदींना पेंटिंग करण्याची क्रेझ वाढली आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकाराच्या फ्रेमही उपलब्ध आहेत. भिंतींना पेंट करण्यासाठी महिला व मुलांची मागणी सर्वाधिक असते. त्यांच्याकडूनच पेंटिंग फ्रेमला पसंती असते. यात फूल, पाने, धार्मिक, कार्टून, बेलबुटासोबतच पक्षी आदींच्या पेंटिंगला सर्वाधिक मागणी आहे.

असे आहेत दर

प्रकार - दर (लीटरमध्ये)

  • पेंट - ९० ते ७५० रु.

  • प्लास्टिक पेंट - ३५० ते ५०० रु.

  • डिझाइनर पेंट - १,००० रु.

  • टर्पेंटाईन - ११० रु.

  • डिस्टेंपर - ६० ते ७० रु. किलो

  • रोलर - १०० ते १५० रु.

  • चुना - १४ ते २५ रु.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com