नागपूर : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी (सीएम केअर) कक्ष मोठा आधार बनले आहे. नागपूर विभागात सात महिन्यांत तब्बल १५८२ रुग्णांना १३ कोटी ८१ लाख २० हजार रुपयांची वैद्यकीय मदत या कक्षातून करण्यात आली आहे..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली, जिल्हा कक्षांची स्थापना करण्यात आल्याने रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. रुग्णांनी प्रथम महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा.जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. संपूर्ण राज्यात पेपरलेस प्रणाली, जिल्हा कक्षांची स्थापना आणि विविध बदलांमुळे गरजू रुग्णांपर्यंत वेळेत मदत पोहोचत आहे..मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार कक्षाचे कामकाज पारदर्शक पद्धतीने सुरू असून यापुढेही जास्तीतजास्त गरजू रुग्णांना मदत केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी कळविले आहे.२० गंभीर आजारांसाठी मदतकॉक्लियर इम्प्लांट (वय वर्षे २ ते ६)हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपणकर्करोग (शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन)रस्ते अपघातबालकांच्या शस्त्रक्रियाहिप व गुडघा रिप्लेसमेंटमेंदूचे आजार, डायालिसिस, अस्थिबंधनबर्न/विद्युत अपघातग्रस्त रुग्णनवजात शिशूंचे आजार इ..आवश्यक कागदपत्रेरुग्णाचे आधार कार्ड व रेशन कार्डरुग्ण दाखल असल्यास जिओ टॅग फोटो (अनिवार्य)तहसील उत्पन्नाचा दाखला (१.६० लाखांपेक्षा कमी)वैद्यकीय रिपोर्ट व खर्चाचे प्रमाणपत्रएफआयआर (अपघातग्रस्तांसाठी)झेडटीसीसी पावती (अवयव प्रत्यारोपणासाठी)सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात aao.cmrf-mh@gov.in वर पाठवावेअधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक: ९३२१ १०३ १०३.जानेवारी ते जुलैदरम्यान विभागात दिलेले अर्थसहाय्य जिल्हा रुग्णसंख्या मदत रक्कमनागपूर १३९६ १२,१६,८२,०००वर्धा ४१ ३९,५५,०००भंडारा ३१ २९,३५,०००गोंदिया ५० ३९,००,०००चंद्रपूर ५४ ४७,४८,०००गडचिरोली ९ ९,००,०००.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.