बापाला पळून न जाण्याचे दिले वचन, गुपचूप प्रियकरासोबत पलायन

love
lovee sakal
Updated on

नागपूर : पुण्यात नोकरीसाठी गेलेल्या मुलीने अवघ्या सहा महिन्यातच प्रियकर गटवला. त्याच्याकडून वडिलांना फोन करून लग्नाची मागणी घालण्यास सांगितले. वडिलांनी नकार दिल्यानंतर मुलीने ‘मी पळून जाणार नाही’ असे प्रॉमिस केले. मात्र, प्रियकराला नागपुरात बोलवून त्याच्यासोबत पलायन केले. (parents filed missing complaint of their daughter in nagpur)

love
नाना पटोले फडणवीसांच्या मतदारसंघावर करणार दावा?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्‍मी (काल्पनिक नाव) २० वर्षांची युवती नंदनवनमध्ये आई-वडील व दोन बहिणीसोबत राहते. वडील शेतकरी असून, उमरेड मार्गावरील एका खेड्यात शेती करतात. मुलींनी शिकून मोठे व्हावे, या उद्देशाने शेतकरी असलेल्या वडिलाने नंदनवनमध्ये बस्तान मांडले. रश्‍मीला आयटीआयमध्ये प्रवेश मिळवून स्वतःच्या पायावर उभे राहण्यास प्रोत्साहन दिले. तिची मैत्रीण पुण्यात एका मोठ्या कंपनीत नोकरीवर होती. त्यामुळे रश्‍मीनेही वडिलांना सांगून पुण्यात जायचे असल्याचे सांगितले. गेल्या सहा महिन्यांपूर्वी रश्‍मीने पुण्यात नोकरी स्वीकारली. दुसरीकडे मुलगी कमावती झाल्याने वडील आनंदात होते. परंतु, रश्‍मीचे तिकडे पुण्यात सोबत नोकरी करणाऱ्या मुलाशी सूत जुळले. दोघांचेही प्रेमसंबंध वाढले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, रश्‍मीने प्रियकराला वडिलांना फोन करून मागणी घालण्याचा सल्ला दिला. त्याने तिच्या वडिलांना फोन केला आणि मागणी घातली. परंतु तिच्या वडिलांनी त्याला झापले. त्यानंतर रश्‍मीची समजूत घातली. तिने ‘पप्पा मी पळून जाऊन लग्न करणार नाही, ’ असे प्रॉमिस केले. बिनधास्त असलेल्या वडिलांना धीर आला. परंतु रश्‍मीने प्रियकराला नागपुरात बोलावून घेतले आणि घरासमोरूनच त्याच्यासोबत पळ काढला. मुलीच्या वडिलांनी नंदनवन पोलिसांत मिसिंगची तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com