
पारशिवनी : शेतातील पाणी अडवण्याच्या जुन्या वादातून पारशिवनी येथे एकाला प्रथम कारने धडक दिली, नंतर तलवारीने सपासप वार करून गंभीर जखमी करण्यात आले. ही धक्कादायक घटना मंगळवारी (ता.२६) दुपारी ४.१५ वाजता पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.