esakal | लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना बुरशीचा धोका कमी, संशोधनातून समोर आली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

mucormycosis

लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना बुरशीचा धोका कमी : संशोधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीचे (corona vaccination) दोन्ही डोस घेतलेल्यांना बुरशी अर्थात म्युकरमायकोसिसचा (mucormycosis) धोका कमी होऊ शकतो, असा निष्कर्ष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. विशेष असे की, राज्यातील धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यासंदर्भातील संशोधन झाल्याची माहिती पुढे आली आहे. (people who fully vaccinated have lower risk of mucormycosis)

हेही वाचा: यवतमाळ : कळंबच्या कन्येला विठ्ठल पूजेत सहभागी होण्याचा मान

धुळे येथील रुग्णालयात ३०० रुग्णांच्या तपासणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या माहितीचे विश्लेषण व निष्कर्षाला आधार ठरणाऱ्या बाबी रुग्णालय प्रशासनानने मुंबईतील वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला सादर केल्या असल्याची माहिती सुत्रांनी दिली. कोरोनाच्या लसीची गुणवत्तादेखील यावरून लक्षात आली असल्याची माहिती यात नमूद आहे. धुळे येथील शासकीय (हिरे) महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या अडीच महिन्यांत ३०० रुग्णांची बाह्यरुग्ण कक्षात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी झाली. यापैकी कोरोनाच्या दोन्ही लस घेतलेला एकही म्यूकरबाधित रुग्ण आढळला नाही. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना, कुठे व कसे उपचार केले या माहितीपासून तर लसीकरणासंदर्भातील माहिती जाणून घेण्यात आली. त्यातून दोन्ही डोस घेणाऱ्यांना बुरशीजन्य आजाराचा धोका कमी होतो हा निष्कर्ष समोर आला आहे. या निष्कर्षाला बळकटी देणारे पुरावे - बाबी व संपूर्ण विश्लेषणात्मक माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आली आहे.

३०० रुग्णांची तपासणी -

कोरोना होऊन गेलेल्या हजारो रुग्णांना बुरशीच्या आजाराने विळख्यात घेतले. बुरशीचा संसर्ग वाढत असताना सुमारे ३०० रुग्णांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणी झाली. केस स्टडीसाठी या रुग्णांची माहिती घेतली. यानंतर कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या एकाही रुग्णाला बुरशीचा आजार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती सामाजिक वैद्यकशास्त्र विभागातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आली.

loading image