कोरोनामुक्तांचा टक्का वाढला; २४ तासांत ७ मृत्यू, २८२ नवीन बाधितांची भर

The percentage of coronamuktas increased in Nagpur
The percentage of coronamuktas increased in Nagpur
Updated on

नागपूर : दोन दिवसांपासून कोरोनाचा कहर ओसरला आहे. सोमवारी (ता. १४) अवघ्या २८२ बाधितांची भर पडली. तर, मागील २४ तासांमध्ये ७ जण दगावले आहेत. यामुळे बाधितांचा आकडा १ लाख १७ हजार ४९३ वर पोहोचला आहे. मृत्यू झालेल्यांची संख्या ३ हजार ८०४ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात नऊ महिन्यांत कोरोनाच्या साडेआठ लाखांपेक्षा जास्त चाचण्या झाल्या आहेत. ८ लाख ५४ हजार ८५१ चाचण्यांपैकी १ लाख १७ हजार ४९३ बाधित आढळले आहेत. यातील १ लाख ७ हजार ९५० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज शहरी व ग्रामीण भागात दिवसभरात ७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात ३ शहरातील तर ग्रामीण भागातील एका बाधिताचा समावेश आहे. तर जिल्ह्याबाहेरच्या ३ बाधितांचा समावेश आहे. 

सोमवारी झालेल्या ७ मृत्यूमुळे शहरात आतापर्यंत सुमारे २ हजार ५९३ मृत्यू झाले आहेत. तर ग्रामीण भागात ६६१ मृत्यू झाले आहेत. जिल्हाबाहेरील ५५० मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ३ हजार ८०४ वर पोहोचली आहे. दिवसभरात शहरात २१२, ग्रामीण भागात ६७ बाधितांची नोंद झाली आहे.

जिल्ह्याबाहेरील ३ बाधितांचा समावेश आज झाला आहे. विभागाच्या नोंदीनुसार सोमवारी शहरात ४ हजार ९०२, ग्रामीण भागात ८३७ असे एकूण ५ हजार ७३९ सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गृहविलगीकरणातील संख्यादेखील कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

दोन दिवसांत ८३२ जणांची कोरोनावर मात

जिल्ह्यात मागील दोन दिवसांत बाधितांची संख्या ५८२ झाली आहे. तर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ८३२ झाली आहे. कोरोनामुक्तांचा टक्का ९१.८७ वर पोहोचला आहे. शहरी भागात दिवसभरात २६०, ग्रामीणला ५८ असे एकूण ३१८ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील कोरोनामुक्तांची संख्या ८५ हजार ४९८ तर ग्रामीण भागातील २२ हजार ४५२ वर पोहोचली आहे.

आजवर झालेले मृत्यू

हॉस्पिटल मृत्यू
मेडिकलमध्ये झालेले मृत्यू १४९१
मेयोत झालेले मृत्यू १२९४
एम्समध्ये झालेले मृत्यू २१
खासगीत झालेले मृत्यू ९५१

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com