esakal | टाळेबंदीच्या काळातील कामांची माहिती ऑनलाइन भरा’
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मागील सत्रात १६ मार्चपासून बंद पडलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये याकरिता शासनाने ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ अभ्यासमाला सुरू केली. या अभ्यासमाला सोशल मीडियावर पाठवून ती शिक्षकांपर्यंत पोहोचविली. त्याद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत होते. त्यातून बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतले. मात्र, त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून आले. याचे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांकडे ॲण्ड्राइड मोबाईल नसल्याने त्यांच्यापर्यंत शिक्षकांना पोहोचता आले नाही. दुसरीकडे बरेच शिक्षक कोरोना सर्वेक्षणाच्या कामात असल्याचे दिसून आले.

टाळेबंदीच्या काळातील कामांची माहिती ऑनलाइन भरा’

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर ः राज्यात मार्चपासून लावलेल्या टाळेबंदीच्या काळात काय काम केले याचा लेखाजोखा आता शिक्षकांना द्यावा लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाने तसे आदेश काढले आहेत. शिक्षकांना सगळी माहिती ऑनलाइन भरावी लागणार आहे.

मागील सत्रात १६ मार्चपासून बंद पडलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये याकरिता शासनाने ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ अभ्यासमाला सुरू केली. या अभ्यासमाला सोशल मीडियावर पाठवून ती शिक्षकांपर्यंत पोहोचविली. त्याद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत होते. त्यातून बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतले. मात्र, त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून आले. याचे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांकडे ॲण्ड्राइड मोबाईल नसल्याने त्यांच्यापर्यंत शिक्षकांना पोहोचता आले नाही. दुसरीकडे बरेच शिक्षक कोरोना सर्वेक्षणाच्या कामात असल्याचे दिसून आले.

आता कोरोना रुग्णांना मिळणार 'श्वास'; संस्थांचा पुढाकार; नागपूर निड टू ब्रेथ' अभियान सुरू

आता या शिक्षकांना प्रेरित करण्यासाठी केंद्रप्रमुखांना ऑनलाइन वेबिनारद्वारे प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले आहे. त्यातून केंद्रप्रमुखांना प्रत्यक्ष अनुभव, गृहभेट व कृती आराखडा तयार करून शिक्षकांनी किती विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन मार्गदर्शन केले, याबाबतची माहिती कशी भरावी हे सांगावे लागणार आहे. यासाठी शिक्षकांना आधी युजर आयडी व पासवर्ड तयार करावा लागणार असून, मोबाईल नंबरच्या साह्याने प्रत्येक वेळी लॉगिन करून माहिती भरावी लागणार आहे. विशेष म्हणजे, या आदेशामुळे शिक्षकांना आता टाळाटाळ करता येणार नसून नियमित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे.

आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा : शरद भांडारकर
राज्यातील कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा असलेल्या १० ते १५ विद्यार्थ्यांना त्यामध्ये असलेल्या शिक्षकांच्या पटसंख्येत विभागून प्रत्यक्ष शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. अशा शिक्षकांनी आळीपाळीने शाळेमध्येच विद्यार्थ्यांना किमान दोन तास शिकविण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. त्याशिवाय विद्यार्थी शिकणार नाहीत, ही वस्तुस्थिती असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक-शिक्षकेतर सेनेचे राज्य सरचिटणीस शरद भांडारकर यांनी सांगितले.  

loading image
go to top