esakal | फुल खिले है गुलशन गुलशन... जाणून घ्या निसर्गसोहळा 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बोगनवेल ही हिरवट पांढरा, लालभडक, जांभळा, सर्वसाधारण दिसणारा गडद गुलाबी अथवा राणी हळदी पिवळा अशा अनेक सुंदर रंगात फुलते. या झाडाला काटे असतात. फांदीच्या शेंड्यावरील काट्याचे परिवर्तन या फुलोऱ्यात होते. बघतच राहावे अशी ही फुले शहरातील रस्त्यांच्या मधोमध फुलली आहेत. https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/i-leave-it-unread-286839

फुल खिले है गुलशन गुलशन... जाणून घ्या निसर्गसोहळा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कमी झालेले प्रदूषण, वाढलेले तापमान आणि अवेळी येत असलेला पाऊस या बदललेल्या वातावरणासह लॉकडाउनमध्ये नागरिक घरात दडले असताना निसर्गाने मात्र आपला नैसर्गिक भाव कायम ठेवत सर्वत्र फुलांची उधळण केली आहे. महाराष्ट्राचे राज्य फूल जारुळ, अमलतास, करंजची फुले, बोगनवेल, देवचाफा, निलक आणि गुलमोहोराने उद्याने, रस्ते काबीज केले आहेत. बघावे तेथे ही फुले फुलली आहेत. यामुळे शहरातील अनेक भागांत नेत्रसुखद फुलांनी फुललेल्या वृक्षांचे दर्शन होत आहे. 
कडक उन्हाळ्यात जांभळ्या रंगाच्या फुलांनी फुललेले हे वृक्ष अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. शहरातील अनेक भागांत रस्त्याच्या शेजारी ही झाडे लावली आहेत. हे झाड साधारण गोलसर, डेरेदार असते. फूल पूर्ण उमलल्यानंतर सहा ते सात सेंटिमीटर व्यासाचे होते. त्या फुलाला झालरीसारखी दुमड असणाऱ्या सहा किंवा सात नाजूक, तलम चुणीदार पाकळ्या असतात. सर्रास पिवळा गुलमोहोर म्हणून काही ठिकाणी ओळख असलेले अमलतास वनस्पतिशास्त्रात पेल्टोफोरम टेरोकारपम म्हणूनही परिचित आहे. या झाडाने उद्यान आणि रस्ते काबीज केले आहेत. बघावे तेथे अमलतास फुलले आहे. 

हेही वाचा : मी पुस्तक हातात घेतो, पण न वाचता ठेवून देतो..!
 

वैशाखच्या वणव्यात स्वर्गसुखाचा आनंद देणारा गुलमोहोर सर्वांचेच लक्ष वेधून घेतो आहे. वर्षातून एकदाच तोही उन्हाळ्यातच फुलतो. लॉकडाउनमुळे त्याचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी रस्त्यावरील गर्दीच गायब झालेली आहे. बोगनवेल ही हिरवट पांढरा, लालभडक, जांभळा, सर्वसाधारण दिसणारा गडद गुलाबी अथवा राणी हळदी पिवळा अशा अनेक सुंदर रंगात फुलते. या झाडाला काटे असतात. फांदीच्या शेंड्यावरील काट्याचे परिवर्तन या फुलोऱ्यात होते. बघतच राहावे अशी ही फुले शहरातील रस्त्यांच्या मधोमध फुलली आहेत. देवचाफा हा शहरातील अनेक भागांत दिमाखात उभा आहे. या झाडांची फुले पांढरी असून, मध्ये पिवळा रंग असतो. ही फुलेही रस्त्याने जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. 

प्रदूषण कमी झालेले असताना तापमानात वाढ झालेली आहे. त्याचे हवे तसे चटके जाणवू लागले आहेत. झाडांची पानगळ झाल्यानंतर ऊन वाढताच अमलतास, जारुळ आणि गुलमोहोराची फुले फुलतात. त्याप्रमाणे यंदा ती फुलली आहेत. अचानक येणाऱ्या पावसामुळे पानगळ झालेल्या झाडांना पाने दिसू लागली असली, तरी उन्हाळी फुले अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. 
-सुधीर बावनकर, वनस्पती अभ्यासक