Pigeon: कबुतरांच्या गुटरगूचा आघात मानवी फुफ्फुसावर; बाल्कनी, खिडक्यांसह एसीच्या आउटलेटवर कब्जा, दाणे न टाकण्याचे तज्ज्ञांचे आवाहन
Pigeon Health Risk: कबुतरांच्या विष्ठेतून पसरणाऱ्या बुरशीमुळे श्वसनाचे विकार, अलर्जी, दम्याचा त्रास आणि डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढतो. तज्ज्ञांनी बाल्कनी, खिडक्या आणि एसी आउटलेटवर कबुतरांना दाणे न टाकण्याचे आवाहन केले आहे.
नागपूर : शहराचा विस्तार होऊन वृक्षतोड होत गेली अन् बहुमजली इमारती बांधल्याने कबुतरांनी निवासस्थान बदलले. बहुमजली इमारतीच्या खिडक्या, बाल्कनीसह वातनुकुलित यंत्राच्या (एसी) आऊटलेटवर त्यांनी बस्तान मांडले.