‘हत्ती नेण्याचा प्लॅन रद्द होईल; गडचिरोलीमध्ये भव्य एलिफंट पार्क’

एलिफंड पार्कसाठी मुख्यमंत्री सकारात्मक असल्याने गुजरातमध्ये गजराज नेण्याचा प्लॅन रद्द होईल
vijay wadettiwar
vijay wadettiwar

नागपूर : अहेरी तालुक्यातील कमलापूर हत्ती कॅम्पमधील आठ हत्ती (Elephant) गुजरात राज्यातील जामनगर येथे उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून उभारण्यात येत असलेल्या खासगी प्राणी संग्रहालयात ठेवले जाणार असल्याची माहिती मिळाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. परंतु, आता तिथेच भव्य एलिफंट पार्क तयार करण्याचे मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठवल्याचे काँग्रेसचे नेते व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी तालुक्यात असलेल्या कमलापूर हत्ती कॅम्पमधील आठ हत्ती (Elephant) गुजरात राज्यात हलविले जाऊ नये, यासाठी जनभावना लक्षात घेता शासनस्तरावर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. स्थानिक जनतेच्या आकर्षणाचे केंद्र म्हणून पर्यटकांना आपलेसे करणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये आधी सात हत्ती होते. आता नव्याने एका हत्तीच्या बाळाचा समावेश झाल्याने एकूण आठ हत्ती झाले आहेत.

vijay wadettiwar
सासूबाईंच्या हॉस्पिटलमध्ये सून करायची गर्भपात; आरोपी किती?

वनविभागाच्या वन्यप्राणी विभागाने हे हत्ती गुजरात राज्यात नेऊन तेथील जामनगर येथे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून उभारण्यात येत असलेल्या खासगी प्राणी संग्रहालयात ठेवले जाणार असल्याचे कळते. याबाबत राज्य स्तरावर मुख्यमंत्री व वनमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला. आता अहेरी तालुक्यातच भव्य एलिफंट पार्क तयार करण्याचे मागणी करणारे पत्र (wrote Letter) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठवले आहे. याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहे. त्यामुळे गुजरातमध्ये हत्ती नेण्याचा प्लॅन रद्द होईल, असे विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) म्हणाले.

गजराज पाठवण्याला राजकीय पक्षांचा विरोध

शिवसेना, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनासह विविध राजकीय पक्ष व स्थानिक नागरिकांनी उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून उभारण्यात येत असलेल्या खासगी प्राणी संग्रहालयात येथील हत्ती (Elephant) ठेवण्याला विरोध केला होता. गडचिरोली जिल्ह्यातील गजराज गुजरातला जायला नको, अशी मागणी मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com