नागपुरवालो ! "चप्पे चप्पे पे पुलिस तुमपे नजर बनाये हुयै है...'

file
file
Updated on

नागपूर : "पुलिसने तुम्हे चारों ओर से घेर लिया हैं, चप्पे चप्पे पे पुलिस तुमपे नजर बनाये हुये हैं, अशा अनेक पोलिसी संवादांनी सत्तर एमएमचा परदा आणि सत्तरचे दशक व्यापून टाकले होते. "चप्पे चप्पे...' सारखे काल्पनिक वाटणारे चित्रपटातील पोलिस संदर्भातील फिल्मी संवाद नागपूरकरांना काही प्रमाणात खरे वाटायला लागले असणार. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खाकीने शहरातीलच नव्हे, तर देशातील "चप्पा चप्पा' व्यापून टाकला आहे.

काळ्या फिल्म'चाही लवकर "द एण्ड'
बहुतांश गाजलेल्या अभिनेत्यांनी युनिफॉर्म चढवून बॉक्‍स ऑफिसवर "धूम' केली आहे. जगदीश राज, इफ्तेखार यांनी तर अनेक चित्रपटांत पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेला न्याय दिला. सध्या लॉकडाउनमुळे जिकडे तिकडे खाकी वर्दीतील पोलिस नजरेस पडतात. सिनेमा, मालिकांमध्ये रस्त्यावर अडवून तपासणी, पोलिस आणि निळ्या व्हॅनने घेरा घातलेला परिसर, असे अनेक दृश्‍य केवळ चित्रपटात बघायला मिळायचे. परंतु, आता जागोजागी हे दृश्‍य साक्षात दिसते. मोमिनपुरा, लकडगंज, सरतरंजीपुरा, बोरियापुरा येथील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने हा भाग सील केला आहे. जागोजागी पिवळ्या रंगातील बॅरिकेड्‌स, कठडे लावले असल्याने येथील रहिवाशांना "चप्पा चप्पा...' हा प्रकार लक्षात आला असणार. चित्रपटात रीळ बदलताच दृश्‍य बदलते, त्याचप्रमाणे कोरोनाच्या "काळ्या फिल्म'चाही लवकर "द एण्ड'व्हायला हवा.

काही गाजलेले पोलिसी संवाद
-जब एक मुजरीम बोलेगा तब एक पोलिस ऑफीसर सुनेगा
-तुम जिस रास्ते पर चल रहे हो, वो यही आकर खत्म होता हैं,
-मारेंगे भी हम और बचायेंगे भी हम...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nagpur Crime
Nagpur Civic Issue
NMC MBBS Admission
NMRDA Land Acquisition
Marathi News Esakal
www.esakal.com