

Tension in Nagpur as Police Face Attack; Vehicle Used to Evade Action
sakal
नागपूर: शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांशी हुज्जत घालून त्यांच्यावर हल्ला करण्याचे प्रकार समोर आले. सीताबर्डी परिसरात नाकेबंदी दरम्यान एका कारचालकाने पोलिसाच्या अंगावर वाहन चढविण्याचा प्रयत्न केला. तर प्रतापनगर परिसरात वाहन तपासणीदरम्यान मायलेकाने महिला पोलिस कर्मचान्याशी धक्काबुक्की केली, दोन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.