राज्याच्या सीमांवर पोलिसांची नाकाबंदी; अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच वाहनांवर निर्बंध

राज्याच्या सीमांवर पोलिसांची नाकाबंदी; अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच वाहनांवर निर्बंध

सावनेर (जि. नागपूर) : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक संचारबंदी सुरू आहे या संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये ,अनावश्यक प्रवास करू नये म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (Curfew) बंद करण्यात आली आहे. यासाठी विनाकारण वाहतुकीसाठी खासगी वाहनांवर निर्बंध लावण्यात आलेले आहेत तालुक्यात मध्यप्रदेशातील(Madhya Pradesh) वाहतुकीवर निर्बंध लावण्यासाठी खुरसापार, केळवद व सिंदेवानी येथे पोलिसांनी (Maharashtra Police) बॅरिकेट उभारून नाकाबंदी सुरू केली आहे. (Police checking on the borders of Maharashtra and MP in Nagpur)

राज्याच्या सीमांवर पोलिसांची नाकाबंदी; अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच वाहनांवर निर्बंध
सावधान! नामांकित कंपन्यांचे अनोळखी कॉल्स उचलताना १० वेळा करा विचार; अन्यथा...

मध्य प्रदेशातही कोरोनाची लागण पसरत असल्याने महत्‍वाचे कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांच्या मध्यप्रदेश पोलिसांकडुन सुद्धा नाका-बंदी व तपासण्या केल्या जात असल्याचे समजते मात्र कोरोना रुग्ण सावनेर किंवा नागपूरसाठी उपचारासाठी येताना दिसत आहे मध्य प्रदेश व महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील पोलिसांनी अत्यावश्यक कामासाठी प्रवासाला सूट दिली आहे.

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली काही प्रमाणात मात्र मध्य प्रदेशातील लोकांचे आवागमन होत असल्याची बाब चर्चेत आल्यानंतर राज्याचे सीमेवरही केळवद,खापा पोलिसांनी चोख बंदोबस्त सुरू केलाय यादरम्यान वाहतूक दारांकडून कागदपत्रांच्या तपासण्या केल्या जात आहेत.

राज्याच्या सीमांवर पोलिसांची नाकाबंदी; अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच वाहनांवर निर्बंध
धक्कादायक! कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरवलेली लहान मुलं परस्पर दत्तक

सावनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मारुती मुळूक यांच्याकडे सध्या केळवद ठाण्याचा कारभार असल्याने त्यांच्या मार्गदर्शनात केळवद पोलिस ठाण्याच्या अंतर्गत खुर्सापार व केळवद सिमेवर कडक नाकाबंदी सुरू दिसत आहे.मध्य प्रदेश पोलिसांच्या भूमिकेमुळे मात्र सीमा पार करून पोटाची खळगी भरणाऱ्या मजुरांना व शेतकऱ्यांना शेतकामासाठी सीमा पार करताना मात्र रोजच कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट दाखवावा लागत असल्याने अडचण निर्माण झाली आहे.

(Police checking on the borders of Maharashtra and MP in Nagpur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com