esakal | ज्यूनिअरला ठाणेदारी, सिनिअर्स अडगळीत; अनेक पोलिस अधिकारी नाराज
sakal

बोलून बातमी शोधा

police

ज्यूनिअरला ठाणेदारी, सिनिअर्स अडगळीत; अनेक पोलिस अधिकारी नाराज

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : पोलिस निरीक्षक म्हणून आताच पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांना थेट ठाणेदारी दिल्याने अनेक वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना (senior police officer) यार्डात बसावे लागले आहे. त्यामुळे पोलिस दलात (nagpur police) नाराजीचा सूर आहे. (police disappointed due to junior police got promotion in nagpur)

हेही वाचा: ...अन् बघता बघता गर्दीचाच झाला सिनेमा! उसळली बघ्यांची गर्दी

शिस्तप्रिय आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून अमितेश कुमार यांची ओळख आहे. त्यांनी पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर ‘फैसला ऑन द स्पॉट’ अशी भूमिका घेतली आहे. शहरातील गुन्हेगार आणि गुन्हेगारी कमी झाल्याने पोलिसांची प्रतिमा उंचावल्या गेली आहे. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांच्या पारदर्शक बदल्या नागपूर पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच झाल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी वर्ग मोठा खूष आहे. परंतु, दुसरीकडे पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी मात्र नाराज आहेत. सेवाज्येष्ठता यादीनुसार ज्युनिअर असलेल्या पोलिस निरीक्षकांना थेट पोलिस स्टेशनचा कारभार देण्यात आला तर सिनिअर असलेल्या अधिकाऱ्यांना मात्र साइड ब्रॅंचला ठेवण्यात आले आहे. काही पोलिस ठाण्यात गुन्हे निरीक्षक पदावरसुद्धा नियुक्ती करायला पीआय नाही आहेत. काही निरीक्षकांनी महत्त्वाच्या पदावर काम केले आहे तसेच पोलिस स्टेशनचे इंचार्जपदाची जबाबदारी सांभाळली आहे, अशा निरीक्षकांना साइड ब्रॅंचला ठेवण्यात आले आहे. अनुभव नसतानाही काहींनी ठाणेदारपदी संधी देण्यात आली आहे. हीच बाब खटकत असल्यामुळे अनेकांचा नाराजीचा सूर आहे.

काहींवर वरिष्ठांची अवकृपा -

काही अनुभवी पोलिस निरीक्षकांनी चांगल्याप्रकारे काम केले असून ते जबाबदारी सांभाळण्यास सक्षम आहेत. परंतु, एसीपी, डीसीपी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या एकाकी धोरणामुळे काही पीआय अडचणीत आहेत. तर काही पीआय थेट बदली होऊन यार्डात बसलेले आहेत.

व्हॉट्सॲप ग्रूपवर चर्चा -

पोलिस निरीक्षकांच्या खासगी व्हॉट्सॲप ग्रूपवर ठाणेदारीत डावलल्याप्रकरणाची मोकळ्यामनाने चर्चा होत आहे. त्यातही संधी न मिळालेले आणि नाराज असलेले पीआय आपापली मते व्यक्त करतात. काहींना अनुभव नसतानाही मोठी जबाबदारी दिल्याची चर्चा नुकताच झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

loading image