कुणी तरी येणार येणार गं ! थाटामाटात पार पडलं श्वानाचं डोहाळे जेवण; नागपुरातील पोलिस अधिकाऱ्याचं अनोखं प्रेम  

Police Officer Celebrated Baby Shower of Dog in Nagpur Latest News
Police Officer Celebrated Baby Shower of Dog in Nagpur Latest News

नागपूर ः ‘कुणी तरी येणार येणार गं’ म्हणत डोहाळे जेवण भरवले जात असते. पण जर हेच डोहाळे जेवण एखाद्या श्वानाचे असेल तर..! दचकू नका, नागपुरात एका कुटुंबाने आपल्या लाडाच्या श्वानाचे मोठ्या थाटामाटात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम घेतला आहे. ऐकावे ते नवलच...एका पोलिस अधिकाऱ्याने चक्क घरी पाळलेल्या कुत्रीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. शेजारी आणि नातेवाईकांना बोलावण्यात आले. कुत्रीला सजवून पाळण्यात बसवले आणि केक कापून आनंदोत्सव साजरा केला. या अजब कार्यक्रमाचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मिडियावर चांगले व्हायरल होत आहेत. प्राण्यांप्रती प्रेम आणि आपुलकी व्यक्त केल्याबद्दल अनेकांनी या उपक्रमाचे कौतूक केले आहे.

अरूण बकाल हे नागपूर शहर पोलिस दलात आहेत. सध्या ते शांतीनगर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. ‘ॲनिमल लव्हर’ म्हणून त्यांची ओळख आहे. कुत्रे, मांजर, गायी आणि पशू-पक्षांवर प्रेम व्यक्त करीत त्यांना चारा-पाणी देत असतात. त्यांच्या मित्राने गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी त्यांना लॅब्रा प्रजातीचे एक कुत्र्याचे पिल्लू गिफ्ट केले होते. त्यांनी त्याचे नाव ‘विन्नी’ ठेवले होते. 

महिन्याभरात विन्नी ही बकाल कुटुंबातील सदस्य बनली. त्यांची पत्नी आरती आणि मुलगा अनिष यांनी विन्नीला भरपूर प्रेम दिले. गेल्या दोन वर्षांपासून विन्नीचा मुलीप्रमाणेच वाढदिवस साजरा करण्यात येत होता. गेल्या दीड महिण्यांपूर्वी विन्नीला डॉ. राऊत यांच्या दवाखाण्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी विन्नी प्रेग्नंट असल्याचे सांगितले. विन्नी आता ‘गुड न्यूज’ देणार म्हणून बकाल कुटुंबीयांनी तिची मुलीप्रमाणे काळजी घेतली. 

डोहाळे जेवणाचा अनोखा थाट 

तिचे खाणे-पीणे तसेच वारंवार डॉक्टरांकडे नेण्यात येत होते. येत्या काही दिवसांतच तिची प्रसुती होणार आहे. त्यामुळे तिच्या डोहाळे जेवनाचा कार्यक्रम आयोजित करण्याची कल्पना त्यांना सूचली. विशेष म्हणजे, डोहाळ जेवण कार्यक्रमासाठी झोका, धनुष्यबाण, फुलांची सजावट आणि पारंपारिक गाणी लावण्यात आली होती. त्यासाठी वैष्णवी आणि स्नेहा यांनी सर्व सजावट केली. 

गर्भवती महिलेप्रमाणे तयारी 

एवढंच नव्हे तर, गर्भवती महिलेला डोहाळ जेवणाला ज्याप्रमाणे हिरवी साडी-चोळी घेतली जाते, त्याचप्रमाणे विन्नीलाही खास शिवलेला हिरवा ड्रेस घालून हेअरस्टाईल करून नटवण्यात आले होते. तर परिसरातील महिलांनीही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. यावेळी महिलांनी विन्नीचे औक्षण करून ओटीही भरली. सध्या या डोहाळे जेवणाची नागपुरात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. अशा श्‍वान प्रेमामुळे बकाल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com