esakal | टॅटू दाखवण्यासाठी श्रुती झाली टॉपलेस; पहा तिची अदा | Tattoo
sakal

बोलून बातमी शोधा

Shruti Hasan

टॅटू दाखवण्यासाठी श्रुती झाली टॉपलेस; पहा तिची अदा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : टॅटू काढणे हे आजच्या घडीला फॅशन झाले आहे. अभिनेता असो, अभिनेत्री असो, खेळाडू असो किंवा सामान्य नागरिक. प्रत्येकजण शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागावर टॅटू काढतो. हा टॅटू प्रत्येकाला दिसावा अशी त्याची इच्छा असते. यासाठी ते हातावर, खांद्यावर, मानेवर टॅटू काढत असतात. मात्र, आपण काढलेला टॅटू दाखवण्यासाठी अभिनेत्री चक्क टॉपलेस झाली. या अभनेत्रीचे नाव आहे श्रुती हसन.

चर्चेत राहायला कोणाला आवडत नाही? अनेकांना नेहमीच चर्चेत राहण्याची सवय असते. यासाठी ते नेहमीच सोशल मीडियाचा आधार घेत असतात. कोणते ना कोणते कृत्य करून तसेच वादग्रस्त विधान करून नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यच ते प्रयत्न करीत असतात. आता यात श्रुती हसनने उडी घेतली आहे. तिने डाव्या खांद्यावर टॅटू काढला आहे. तो टॅटू दाखवण्यासाठी तिने फोटो शेअर केला आहे. फोटो पाहून सर्वांच्याच भोवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा: वात, पित्त, कफ असे त्रिदोष; वाचा कोणते पेय ठरते योग्य

श्रुती ही चित्रपटांसोबतच बोल्ड अंदाजासाठीही ओळखली जाते. श्रुतीने गोंदवलेला हा टॅटू म्हणजे तामीळ भाषेतील तिचे नाव आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने म्हटले आहे ‘माझ नाव बोला... जोरात बोला...’ श्रुतीच्या या फोटोला अनेक लाईक्स मिळत आहे.

loading image
go to top