
Nagpur News : नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू असून १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंध घालण्यात आला असून मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यासही प्रतिबंध घालण्यात आला आहे.
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चे २ ) मधील नियम १४४ अन्वये या कालावधीत बेकायदेशीर जमाव जमविण्यास व सार्वजनिक प्रचार सभा आयोजनास बंदी राहणार आहे. मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपचारिक ओळखचिठ्ठ्या साध्या पांढऱ्या कागदावर असणे आवश्यक आहे. तसेच त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव मुद्रित करण्यावर बंदी असणार आहे.
मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात निवडणूक कर्तव्यावरील वाहन वगळता इतर सर्व वाहनांना बंदी राहणार आहे. मतदान केंद्रात मतदार, उमेदवार व त्यांचे निवडणूक व मतदान प्रतिनिधी यांच्या व्यतिरिक्त फक्त निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळविलेल्या व्यक्तींनाच प्रवेश राहणार आहे.
मतदान केंद्रात मतदानाचे दिवशी मोबाईल,स्मार्ट फोन, वायरलेस सेट नेण्यास प्रतिबंध राहील. मतदान केंद्राध्यक्ष, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था पथक प्रमुख, निवडणुकीच्या कर्तव्यावरील सुरक्षा कर्मचारी यांना उक्त प्रतिबंध लागू राहणार नाही.
नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघात निवडणूक प्रचार दिनांक १७ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ पासून बंद होत असला तरी, घरोघरी प्रचारावर निर्बंधाच्या कालावधीत प्रतिबंध असणार नाही. परंतु ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध असेल. दवाखान्याच्या गाड्या, ॲम्बुलन्स, दुधगाड्या, पाण्याचे टँकर्स, विद्युत विभाग,पोलिस,निवडणूक कर्मचारी यांच्या वाहनावर बंदी राहणार नाही. विहित मार्गाने जाणाऱ्या बस गाड्यावर बंदी राहणार नाही.
टॅक्सी इत्यादी वाहने बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, हॉस्पिटलकडे जाणारी वाहने यावर बंदी राहणार नाही. दिव्यांग व आजारी व्यक्तीस मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाणे-येणे करिता आजारी, दिव्यांग व्यक्तींच्या वैयक्तिक वाहनास बंदी असणार नाही.
मतदारांना लाच देणे, मतदारांवर गैरवाजवी दडपण, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, तोतयेगिरी करणे तसेच मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रचार करण्यास बंदी राहणार आहे. मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर ने-आण करण्याच्या प्रथेस पायबंद घालण्यासाठी टॅक्सी, खासगी कार,
ट्रक, ऑटोरिक्षा, मिनी बस, स्टेशन व्हॅन, स्कूटर, मोटार सायकल इत्यादी सर्व प्रकारच्या वाहनांवर बंदी राहणार आहे. मतदानाच्या दिवशी ओळख चिठ्ठ्या वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान केंद्राच्या परिसरात भित्तिपत्रके, ध्वज, चिन्हे आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करण्यास बंदी असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.