esakal | पूनमच्या लावणीची रसिकांना भुरळ; विपरीत परिस्थितीवर मात करत घेतली बॉलिवूडमध्ये झेप
sakal

बोलून बातमी शोधा

पूनम केकन

पूनमच्या लावणीची रसिकांना भुरळ; घेतली बॉलिवूडमध्ये झेप

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : एखादी कला मनापासून जोपासली आणि समर्पित होऊन कठोर मेहनत घेतल्यास यश तुमच्या पाठीमागे धावते. अकोल्याची नृत्यांगना व लावणी कलावंत पुनम केकन (Poonam Kekan) ही त्यापैकीच एक. लावणीत पारंगत (Expert in lavni dance) असलेल्या पूनमने अदाकारी व अभिनयाच्या जोरावर देशभरातील रसिकांच्या मनावर भुरळ पाडली असून, थेट सिनेमासृष्टी गाठली (reached in Bollywood) आहे. (Poonam-overcame-adversity-and-took-a-leap-in-Bollywood)

२७ वर्षीय पूनमचा आतापर्यंतचा प्रवास संघर्षपूर्ण पण तेवढाच प्रेरणादायी राहिला आहे. मूळ राजंदा या छोट्याशा गावच्या पूनमचे बालपण अकोल्यात गेले. तिला लहानपणपासूनच अभिनयाची आवड होती. परंतु घरच्या परिस्थितीमुळे अभिनयाचे विशेष प्रशिक्षण घेता आले नाही. पूनमचे वडील अकोला महानगरपालिकेतील अग्निशमन विभागात रोजंदारीवर वाहनचालक असून, आई घरकाम करते. घरात कुणीही कलावंत नाही. किंवा कलेचा गंधही नाही. टीव्हीवर कार्यक्रम पाहात असताना नृत्य, लावणी व अभिनयाबद्दल आकर्षण निर्माण झाले. यातच करिअर करायचे या इराद्याने झपाटलेल्या पूनमने त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. तिने आपली आवड जोपासत थेट बॉलिवूडमध्ये झेप घेतली.

हेही वाचा: पत्नी उच्चशिक्षित असेल तरीही पोटगी द्या : उच्च न्यायालय

अष्टपैलू पूनम शालेय कार्यक्रम किंवा सार्वजनिक ठिकाणी ढोल वाजवणे, नृत्य व अभिनय करायची. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिने लावणीची कला आत्मसात केली. मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करीत तिने स्वतःची ओळख निर्माण केली. आकाश बिजवे यांच्याकडून लावणीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या पूनमने अमरावती विद्यापीठातर्फे आयोजित नृत्य स्पर्धेत सलग दोन वर्षे कलर कोट मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तिने आतापर्यंत विदर्भातील अकोला, अमरावतीसह जळगांव, दिल्ली, पंजाब, मध्यप्रदेश आणि ओडिशा येथील नृत्य स्पर्धांमध्ये महाराष्ट्रीयन लावणी सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली असून, अनेक पुरस्कार पटकाविले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाची संधी

कला शाखेची पदवीधर असलेल्या पूनमने जिद्द, मेहनत व चिकाटीच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टीत काम मिळवले आहे.‘डॅड चिअर्स’ या सिनेमात सादर केलेल्या नृत्यानंतर तिला ‘संशय’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून संधी मिळाली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पूनमचे बॉलिवूडमध्ये नाव कमावण्याचे स्वप्न असून, त्यासाठी तिची सध्या धडपड सुरू आहे.

(Poonam-overcame-adversity-and-took-a-leap-in-Bollywood)

loading image