२२ व्या वर्षी बनला CA, आता महिन्याला ५ लाख पगार

pratik
pratik e sakal

काटोल (जि. नागपूर) : तालुक्यातील कोंढाळी (kondhali) येथील सामान्य परिवारातील तरुण प्रतीक भगवान चांडक ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी ठरला. युकेमधील लंडन शहरात (London) त्याची वार्षिक ६० हजार पाउंड वेतनावर नियुक्ती झाली. २६ जुलै २०२१ ला कामावर रुजू झाला आहे. भारतीय चलनात त्याला मासिक सुमारे ५ लाख वेतन निश्चित झाले आहे.

pratik
अल्पवयीनचा जबरदस्तीने गर्भपात; खुंटीवर पिशवीमध्ये ठेवले अर्भक

प्रतीक याचे दहावीपर्यंत शिक्षण कोंढाळी येथे झाले. लाखोटीया भुतडा विद्यालयात दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याने चार्टर्ड अकाउंटेंट होण्याचे मनोमन ठरविले. २०१८ मध्ये ‘आय मॅक’ कंपनीत एक वर्ष नोकरी केली. त्यानंतर आपल्याला जीवनात काही बनायचे आहे, असे ठरवून त्यासाठी प्रयत्न केले. अवघ्या २२ व्या वर्षी वाणिज्य शाखेतील प्रतिष्ठेची व अतिशय कसब लावणारी चार्टर्ड अकाउंटंट पदवी मिळविली. त्यानंतर २०१९च्या सप्टेंबरला फ्रान्स येथे ‘मास्टर सिन फायनान्स’ ही दोन वर्षाची पदवी घेऊन शैक्षणिक पात्रता मजबूत केली. त्याच पात्रतेवर त्याची लंडन येथे निवड झाली आहे.

जगात कोविड१९ महामारी असताना देश विदेशात राहून कुठेही न डगमगता आपले ध्येय गाठले. हे तरुणांना प्रेरणा देणारे आहे. त्यांनी मिळविलेली महापगाराची नोकरी खरोखर अभिमान वाढविणारी तितकीच कौतुकास्पद ठरली आहे. त्याचे वडील भगवान चांडक म्हणाले की, प्रतीक हा ध्येयनिष्ठ आहे. त्याने स्वतः मिळकत मिळवून कर्तबगारीवर यश संपादन केले आहे. त्याची आई कल्पनासोबत तो आपले मत नेहमी शेअर करतो. मोठ्या पगारावर जागतिक प्रतिष्ठेच्या कंपनीत जॉब मिळवून आमच्या कुटुंबाची मान त्याने उंचावली आहे. त्याचा लहान भाऊ गगन रामदेव बाबा इंजिनिअरींग कॉलेजमधून बी.ई.इलेक्ट्रॉनिक्स होऊन शिकागो येथे एम.एस करणार असल्याचे प्रतिकचे मार्गदर्शक हरीश राठी यांनी सांगितले.

प्रतीक चांडक हा शालेय स्तरापासूनच एक हुशार विद्यार्थी होता. अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रामध्येही त्याला आवड होती. मुंबई येथे झालेल्या तलवारबाजी स्पर्धेमध्ये त्याने शाळेचे प्रतिनिधित्व केले आहे. २२ व्या वर्षीच सीए होऊन शाळेचे शाळेचे नाव व स्वतःचे करिअर त्यांनी उज्वल केले आहे. प्रतीकने फ्रान्समध्ये एम.एस.पदवी मिळविताना नोकरी करून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. प्रतीक खरंच एक हुशार आणि प्रतिभावान विद्यार्थी आहे. म्हणून त्याला आज साठ लाख प्रती वर्षाचे पॅकेज मिळाले आहे. त्याला पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
- हरीश राठी, व्यवसाय मार्गदर्शक तथा शिक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com