esakal | नागपुरात सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा, गरिब मुलांना मिळणार मोफत शिक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur NMC

नागपुरात सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा, गरिब मुलांना मोफत शिक्षण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेच्या सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा (nagpur municipal corporation english medium school) सुरू झालेल्या शैक्षणिक सत्रापासून सुरू करण्यात येणार आहे. केजी-१, केजी-२ व पहिल्या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या शाळांमध्ये झोपडपट्टी तसेच गरीब मुलांना मोफत इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. ‘आकांक्षा’ या संस्थेसोबत २० वर्षांसाठी करार करण्यात आला असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. (poor student get free education from nagpur municipal corporation english medium school)

हेही वाचा: सेना, राष्ट्रवादींवर पटोलेंचे आरोप, नंतर घुमजाव; म्हणाले...

महापालिकेने यापूर्वीच विधानसभा क्षेत्रनिहाय प्रत्येकी एक, अशा सहा शाळा सुरू करण्याचा निर्धार केला होता. सर्व प्रक्रियेनंतर सामाजिक संस्थांकडून ईओआय मागविण्यात आले. यात दोन संस्था आल्या. यापैकी आकांक्षा ही संस्था मुंबई, नवी मुंबई व पुणे महापालिकेसोबतही इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवित आहे. पुण्यातील संस्थेचे काम बघितल्यानंतर आकांक्षा या संस्थेची निवड करण्यात आली. त्यानुसार आता शहरातील गरीब, मध्यमवर्गीयांच्या वस्त्या तसेच झोपडपट्टीनजिकच्या महापालिकेच्याच बंद पडलेल्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात येत असल्याचे महापौर तिवारी म्हणाले. राज्य बोर्डानुसार अभ्यासक्रम राहणार आहे. याशिवाय केंद्र सरकारकडे ८ शाळांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या शाळांचीही भर पडणार आहे. शहरातील मराठी, हिंदी व उर्दू माध्यमातील शाळांच्या सुधारणेसाठी संस्था आल्यास त्यांचेही स्वागत आहे, असे महापौर म्हणाल्या. मराठी, हिंदी व उर्दू शाळाही आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. यावेळी उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर उपस्थित होत्या.

विधानसभा क्षेत्रनिहाय शाळा -

 • उत्तर नागपूर - राणी दुर्गावती प्राथमिक शाळा

 • पूर्व नागपूर - बाभूळबन मराठी प्राथमिक शाळा

 • दक्षिण-पश्चिम नागपूर - स्व. बाबुरावजी बोबडे मराठी प्राथमिक शाळा

 • पश्चिम नागपूर - रामनगर मराठी शाळा

 • दक्षिण नागपूर - रामभाऊ म्हाळगीनगर मराठी प्राथमिक शाळा

 • मध्य नागपूर - स्व. गोपालराव मोटघरे हिंदी उच्च प्राथमिक शाळा

विद्यार्थ्यांना या सुविधा मोफत

 • गणवेश

 • बसची पास

 • पुस्तके

शिक्षकांना सहावा वेतन आयोग

मनपाच्या सहाही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी आकांक्षा ही संस्था नवीन इंग्रजी शिक्षकांची नियुक्ती करणार आहे. शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन दिले जाईल. वेतनाचा भार महानगरपालिका आणि आकांक्षा फाउंडेशन संयुक्तपणे उचलणार आहे.

सद्यःस्थितीत मनपाच्या शाळा

 • प्राथमिक शाळा - १०१ (मराठी ३५, हिंदी ४७, उर्दू १९, इंग्रजी १)

 • उच्च माध्यमिक शाळा - २९ (मराठी ८, हिंदी ११, उर्दू ९, इंग्रजी १)

 • शिक्षक - ९५२

loading image