नागपूर : मी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचा भाचा असून मंत्रालयामार्फत एमबीबीएस प्रवेश मिळवून देतो’ अशी बतावणी करीत आरोपीने पालकांची १८ लाख १३ हजार रुपयांनी फसवणूक केली. .याप्रकरणी मोहन व्यंकट खोब्रागडे (वय ५०, भारतनगर, वडधामना) यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी ठकबाजाविरोधात गुन्हे दाखल केले आहे. निखील विश्वनाथ कांबळे (वय ४०, फार्च्यून अपार्टमेंट, मनिषनगर) असे आरोपीचे नाव आहे..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन खोब्रागडे सेवानिवृत्त सैनिक असून ते वायरलेस विभागात २०१२ पासून कार्यरत आहेत. त्यांची मुलगी साक्षी हिला २०२२ मध्ये एमबीबीएस करायचे होते. मात्र, गुण कमी पडल्याने त्यांनी तिला रशियात पाठविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांचे मित्र, प्रशांत सुर्यनंद उईके यांनी त्यांची भेट निखील कांबळे याच्याशी करून दिली. .त्यांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा भाचा असल्याची बतावणी केली. त्याने रशिया पाठविण्यापेक्षा शहरातच प्रवेश देण्यास सांगून सामाजिक न्याय विभाग मंत्रालयाच्या माध्यमातून १०० टक्के येथील लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असे सांगितले. दरम्यान त्यासाठी ३० लाख रुपये द्यावे लागतील असेही तो म्हणाला..सुरुवातीला त्यांनी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक अशोक गेडाम, प्रशांत उईके यांच्यासह मनिषनगरातील १५ लाख रुपये दिले. यावेळी निखील यांची पत्नी शितल कांबळे यांना पैसे ठेवण्यास दिले. काही दिवसांनी मुलीचे संपूर्ण कागदपत्र मागवून घेतले. त्यानंतर सात दिवसांनी कळवितो असे सांगितले. मात्र, त्यानंतर महिना लागेल असे सांगून टाळाटाळ सुरू केली. यादरम्यान दिल्लीतून एका व्यक्तीने फोन करून प्रवेशाची कारवाई सुरू असून निखील कांबळे यांना बोलून घ्या, असे सांगण्यात आले. .PM Narendra Modi : पंतप्रधानांनी केले नागपूरकर दिव्याचे कौतुक; जागतिक ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत ‘वर्ल्ड चॅम्पियन’ला हरविले.निखील कांबळे यांनी त्यांना ३ लाख १५ हजारांचा डिमांड ड्राफ्ट तयार करण्यास सांगितला. मात्र, त्यानंतर प्रवेशासाठी निखीलने टाळाटाळ सुरू केली. याशिवाय वेळ निघून गेली असून पुढल्या वर्षी प्रवेशासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या घरी गेल्यावर पत्नी आणि आजी यांनी विश्वास दाखवित आठवले यांच्याशी बोलणे झाल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर त्यांनी फोन उचलणे बंद केले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे कळताच, बेतलरोडी पोलिसांत तक्रार दाखल केल्याने निखील कांबळे आणि त्यांची पत्नी शितल यांच्याविरोधात फसवणूक आणि विविध कलमांसह गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.