भारतीय डाक विभागातील कर्मचारी धास्तावलेले, काय असावे कारण

post office employees Scared
post office employees Scared

नागपूर : भारतीय डाक विभागातील एका महिला कर्मचाऱयाचा कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने, पोस्ट ऑफीसमधील सर्वच कर्मचारी धास्तावले आहेत. अशा परिस्थितीतही जिपीओ ऑफीसमधील इंडीया पोस्ट बॅंकेची जास्तीत जास्त खाती उघडण्याचे टार्गेट कर्मचाऱयांवर लादीत, प्रशासनाने असंवेदनशिलतेचा कळस गाठला आहे.

जिपीओ मधील एसबीपीओ विभागातील वरीष्ठ पदावरील महिला कर्मचाऱयांची कोरोना चाचनी सकारात्मक आली आहे. ज्या दिवशी चाचणी केली त्या दिवसापर्यंत संबधित महिला कर्मचारी कार्यालयात येत होत्या. शिवाय त्याचा वावरही सर्वच विभागात होता. त्यामुळे आपल्याला तर, लागण झाली नसेल ही भिती तेथील प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मनात घर करून बसली आहे.

टपाल कार्यालयातील प्रशासनाने मात्र केवळ संबधित विभागातील कर्मचाऱ्यांना होम कोरोनंटाईन करून आपली जबाबदारी पार पाडल्याचा आव आणला आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा परिस्थितीत केवळ अत्यावश्यक कामे सुरू ठेवणे अपेक्षित असतांना जिपीओमधील इंडियन पोस्टल बॅंकेच्या खातेदारांची संख्या वाढविण्याचे काम प्रत्येकांवर सोपविण्यात आली आहे.

जिपीओमध्ये एकून ११० कर्मचारी कार्यरत असून, या सर्वांनाच रोजचे ठराविक टार्गेट देण्यात आले आहे. खाती न उघणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली जात असल्याने, कर्मचारी वर्गात असंतोष पसरला आहे.

४८ तासांनतर कार्यालय सॅनिटॉयझर 
भारतीय पोस्ट विभागाच्या नागपूर विभागातील मुख्यालयात ५ ॲगास्ट रोजी कोरोना रुग्ण आढळून आल्याने, तेथील कर्मचारी आणि संपर्कात आलेले पोस्टमॅन यांच्यामार्फत अधिक संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याने, प्रशासनाने सर्तकता बाळगणे आवश्यक होते. मात्र, नागपूर महानगरपालिकेकडून तब्बल ४८ तासाननंतर म्हणजे शनिवार (ता. ८) रोजी सायंकाळी उशिरा कार्यालय सॅनिटायझर करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com