
नागपूर : एखादी गोष्ट करण्याची मनात जिद्द असेल आणि डोळ्यासमोर निश्चित ध्येय असेल, तर मार्ग आपोआपच सापडतात. शहरातील आंतरराष्ट्रीय महिला जिम्नॅस्ट व प्रशिक्षक प्राची पारखी हे असेच आदर्श उदाहरण म्हणता येईल. प्राचीने कुणाचीही मदत न घेता स्वबळावर चक्क घराच्या गच्चीवरच अकादमी सुरू करून भविष्यातील स्टार जिम्नॅस्ट घडवित आहे.