Droupadi Murmu Nagpur Visit : मातृभाषेचा अंगीकार करण्यासाठी प्रयत्न करावे; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपतींनी घेतले कोराडीतील जगदंबेचे दर्शन
Droupadi Murmu Nagpur Visit
Droupadi Murmu Nagpur VisitSakal
Updated on

नागपूर : मातृभूमी, मातृभाषा आणि माता या तीन बाबी सर्वश्रेष्ठ आहेत. सर्वांनी जाणीवपूर्वक मातृभाषेचा अंगीकार करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी येथे केले.

कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राच्या उद्‍घाटनप्रसंगी राष्ट्रपती बोलत होत्या. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित,

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, जगदीश लखाणी, राजेंद्र पुरोहित आणि अन्नपूर्णी शास्त्री यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपती पुढे म्हणाल्या, देशविदेशात शिक्षण आणि नोकरीसाठी जाताना आपली मातृभाषा मात्र विसरू नका.

Droupadi Murmu Nagpur Visit
Nagpur Crime: धक्कादायक! नागपूरात बसमध्ये प्रवासी महिलेवर चाकू हल्ला; आरोपी फरार

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये भारतीय संस्कृती आणि स्वातंत्र्याचा जाज्वल्य इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हे केंद्र महत्त्वाचे आहे. रामायणाने भारतीय संस्कृतीला नात्यातील आदर्श जपण्याचा संदेश दिला आहे.

केंद्रातील रामायणाचे सचित्र सादरीकरण युवा पिढीला भारतीय संस्कृतीशी जोडण्याचे कार्य करेल. बनवारीलाल पुरोहित यांचे स्वागतपर भाषण झाले. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेने विमानतळ, राजभवन व कोराडी मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती.

Droupadi Murmu Nagpur Visit
Nagpur Police Action : बेपत्ता दोन अल्पवयीन मुलींना शोधण्यात यश; पालकांच्या रागावर सोडले घर

राष्ट्रपती प्रथमच महाराष्ट्रात येत असल्याने आवश्यक, पूरक व्यवस्था तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरात यावेळी सुमारे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला .

राष्ट्रपतींनी घेतले कोराडीतील जगदंबेचे दर्शन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी कोराडी येथील मंदिरात महालक्ष्मी जगदंबा देवीचे दर्शन घेतले. मंदिर समितीतर्फे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देवीच्या प्रतिकृतीची भेट देऊन स्वागत केले. महालक्ष्मी जगदंबा मंदिर पुरातन असून भोसलेकालीन साम्राज्यात या मंदिराचे मूळ बांधकाम करण्यात आले.

Droupadi Murmu Nagpur Visit
Nagpur News : धक्कादायक! नागपूरात बी.एस्सी. नर्सिंग कॉलेज’मध्ये जम्मू काश्‍मीरच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

टीव्हीवरील मालिकेने रामायण आणि महाभारत घराघरात पोहचले होते. याद्वारे रामायणाचे मूल्य, आदर्श जीवन पद्धती युवापिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.

- रमेश बैस, राज्यपाल

आध्यात्म आणि स्वातंत्र्य लढ्याला जोडणारे हे केंद्र जागतिक दर्जाचे आहे. ते बघण्यासाठी महाराष्ट्रच नव्हे तर देशविदेशातून पर्यटक बघायला येतील. देशभक्ती, अध्यात्म असा संगम येथे आहे.

- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

भारताची गौरवशाली संस्कृती व इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्याचे महत्त्वपूर्ण आणि स्तुत्य कार्य या केंद्राद्वारे झाले आहे. त्यातून भावी पिढीला निश्चितच प्रेरणा मिळेल.

-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.