
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी (ता.३०) नागपूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, ते पाच तास ते शहरात राहणार आहेत. दौऱ्याचा पहिला कार्यक्रम संघभूमी अशी ओळख असलेल्या रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती मंदिर येथे होणार आहे.