Nagpur : देवदर्शन नक्कीच घ्या, पण शेतकऱ्यांनाही प्राधान्य द्या!

अनिल देशमुखांचा मुख्यमंत्र्यांना टोला
Anil Deshmukh
Anil Deshmukh Esakal

नागपूर : गेल्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या समस्येला प्राधान्य दिले पाहिजे. देवदर्शन घेणे चुकीचे नाही. परंतु शेतकऱ्यांच्या अडचणी प्राधान्याने सोडविल्या पाहिजे, असा टोला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

Anil Deshmukh
Nagpur : वज्रमूठ सभेवरून ठिणगी; भाजप-मविआ आमने-सामने!

येत्या १६ एप्रिलला नागपुरात महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेबाबत माहिती देण्यासाठी प्रेस क्लबमध्ये रविवारी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. आठ महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे मोसंबी व संत्र्याचे नुकसान झाले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे नुकसानभरपाईसंबंधी अहवालही पाठवला. विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केला.

Anil Deshmukh
Nagpur : बिल न चुकता देता; मुबलक पाणी कधी देणार?

फडणवीस यांनी मदतीचे आश्वासन दिले. परंतु अधिवेशऩ संपून पंधरा दिवस झाल्यानंतरही संत्रा, मोसंबी उत्पादकांना मदत मिळाली नाही. लवकरात लवकर मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही यावेळी देशमुख यांनी दिला. सरकारने पंधरा लाख कापसाच्या गाठी आयात केल्या. त्यामुळे कापसाचे भाव कोसळले अन् कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com