esakal | या कारागृहातील कैद्यांनी मिळविली "एमबीए' ची पदवी 
sakal

बोलून बातमी शोधा

prisioners

चारही आरोपींना विविध खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यापैकी आशिष वरंवले, अमित गांधी, क्‍लींट फर्नांडिस या तीघांना जिल्हा न्यायालयाने फाशी तर सतीश बन्सोडला जन्मठेपेची शिक्षा बजावली. मिळालेल्या शिक्षेमुळे केलेल्या गुन्ह्यांचा पश्‍चातापही त्यांना झाला. मात्र, उच्च न्यायालयात या विरोधात केलेल्या अपिलामध्ये तिघांची फाशी रद्द करून त्याचे शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत करण्यात आले.

या कारागृहातील कैद्यांनी मिळविली "एमबीए' ची पदवी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर : आयुष्यात क्षणिक रागातून खुनासारखा गुन्हा घडला. या गुन्ह्याने संपूर्ण आयुष्य बदलवून टाकले. गुन्ह्याचा पश्‍चाताप झाला तेव्हा बराच उशिर झाला. त्यामुळे आयुष्यातील समोरचे जीवन सत्कारणी लावण्यासाठी कारागृहातील बऱ्याच कैद्यांनी शिक्षणाचा मार्ग पत्करला. गेल्या काही वर्षात कारागृहात असलेल्या कैद्यांमध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, या संख्येत जन्मठेपेच्या चार कैद्यांनी "एमबीए'सारखी उच्च पदवी मिळविली आहे. 

सतीश बन्सोड, आशिष वरंवले, अमित गांधी, क्‍लींट फर्नांडिस अशी या चार कैद्यांची नावे आहेत. चारही आरोपींना विविध खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यापैकी आशिष वरंवले, अमित गांधी, क्‍लींट फर्नांडिस या तीघांना जिल्हा न्यायालयाने फाशी तर सतीश बन्सोडला जन्मठेपेची शिक्षा बजावली. मिळालेल्या शिक्षेमुळे केलेल्या गुन्ह्यांचा पश्‍चातापही त्यांना झाला. मात्र, उच्च न्यायालयात या विरोधात केलेल्या अपिलामध्ये तिघांची फाशी रद्द करून त्याचे शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत करण्यात आले.

चालान करत होता वाहतूक पोलिस, अन् घडला विचित्र अपघात
 

इग्नूच्या दीक्षान्त सोहळ्यात चौघांना मिळणार पदवी 
त्यामुळे उरलेल्या दिवसात शिक्षणातून आत्मविकास साधण्यासाठी त्यांनी प्रथम बीएमध्ये प्रवेश घेतला. यानंतर एमए समाजशास्त्र तर दोन वर्षांपूर्वी त्यांनी "एमबीए'ची पात्रता परीक्षा देत, त्यात उत्तीर्ण होऊन एमबीए अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. विशेष म्हणजे एमबीए अभ्यासक्रमात चांगल्या गुणासह ते उत्तीर्ण झाले आहेत. साधारणत: 35 ते 40 वयोगटातील कैदी असल्याने त्यांची शिक्षा संपल्यावर या पदवीचा उपयोग नोकरीसाठी करता येणे शक्‍य होणार आहे. 

प्राध्यापक करायचा लैंगिक शोषण, पीडित विद्यार्थिनीने घेतला हा निर्णय
 

सोमवारी दीक्षान्त समारंभ 
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ सोमवारी (ता.17) आयोजित करण्यात आलेला आहे. यानुसार विभागीय केंद्राद्वारे हिस्लॉप येथील सभागृहात दुपारी बारा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी प्रमुख अतिथी राहतील.

देवा किती निर्दयी रे तू...! एकाचवेळी मायलेकीला बोलवलस...
 

यंदाही विद्यापीठातील ज्योती दासिला या एनालिटीकल केमेस्टी या विषयातील पदव्युत्तर पदविकेत देशात प्रथम आल्याबद्दल सुवर्णपदकाने सन्मानित केल्या जाणार आहे. यावर्षी विभागीय केंद्रातून 1 हजार 124 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत अशी माहिती संचालक डॉ. शिवस्वरूप यांनी दिली.

loading image