esakal | ही तर अक्षरशः लूटमार! खासगी सिटी स्कॅन केंद्रांवर रुग्णांची लूट; मेडिकलमध्ये मात्र मोफत

बोलून बातमी शोधा

private labs are demanding for more money for City scan than government in Nagpur

खासगी प्रयोगशाळेत ‘आरटीपीसीआर’साठी अवघे ५०० ते ८०० तर रॅपीड अँटीजेन चाचणी अवघ्या १५० रुपयात केली जाते. मात्र सीटी स्कॅन केंद्रावर एचआरसीटीच्या निदानासाठी अडीच हजार रुपये मोजावे लागतात

ही तर अक्षरशः लूटमार! खासगी सिटी स्कॅन केंद्रांवर रुग्णांची लूट; मेडिकलमध्ये मात्र मोफत
sakal_logo
By
केवळ जीवनतारे

नागपूर ः कोरोना झालेल्या रुग्णाला आता ‘एचआरसीटी’ ची चाचणी करणे जवळपास आवश्यक केले आहे. मेडिकलमध्ये ही चाचणी मोफत केली जात असली तरी खासगी सीटी स्कॅन केंद्रांवर यासाठी अडीच हजार रुपये आकारण्यात येत आहेत. सामान्यांना ही रक्कम परवडणारी नसल्याने कोरोना चाचणीच्या धर्तीवरच ‘एचआरसीटी’ चाचणीचे दर निश्चित करण्यात यावेत,अशी मागणी आता जोर धर लागली आहे.

सोनेरी पहाट आणि उंच गुढीचा थाट! अशा पद्धतीनं करा गुढीची शास्त्रयुक्त पूजा; जाणून घ्या 

खासगी प्रयोगशाळेत ‘आरटीपीसीआर’साठी अवघे ५०० ते ८०० तर रॅपीड अँटीजेन चाचणी अवघ्या १५० रुपयात केली जाते. मात्र सीटी स्कॅन केंद्रावर एचआरसीटीच्या निदानासाठी अडीच हजार रुपये मोजावे लागतात. विशेष असे की, शहरात सीटी स्कॅन केंद्रावर प्रचंड गर्दी असते. रात्री उशिरापर्यंत वेटिंगवर रुग्ण असतात.

गरीब रुग्णांसाठी मेडिकल, मेयोसह सर्व शासकीय रुग्णालयात ज्येष्ठ नागरिक असो की, बीपीएल तसेच कोरोनाच्या प्रत्येकाची सीटी स्कॅनवरील एचआरसीटी निदान मोफत केले जाते. मात्र, गरिबांना खासगीत एका एचआरसीटीसाठी अडीच हजार मोजावे लागतात. चाचणी केल्यानंतर एचआरसीटी करणे जरुरीचे आहे, असे सांगण्यात येत असल्याने सीटी स्कॅन केंद्रावर रुग्णांची मोठी गर्दी बघायला मिळते. पहिल्या लाटेत ही सीटी स्कॅन केंद्रावर अशी गर्दी दिसत नव्हती, हे विशेष.

Success Story: हिरव्यागार शेतात वन्य प्राण्यांचा...

जिल्हाधिकारी यांनी दर निश्चित करून शासनाला प्रस्ताव पाठवून गरिबांची होत असलेली लुट थांबवावी. कोरोना चाचण्यांच्या धर्तीवर एचआरसीटी निदानासाठी दर निश्चित करावे.
-त्रिशरण सहारे, 
अध्यक्ष, विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य कर्मचारी संघटना, नागपूर.

संपादन - अथर्व महांकाळ