esakal | डेटा चोरीतून खासगी आयुष्य चव्हाट्यावर, सोशल मीडिया कंपनी चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

data theft

डेटा चोरीतून खासगी आयुष्य चव्हाट्यावर, सोशल मीडिया कंपनी चर्चेत

sakal_logo
By
केतन पळसकर

नागपूर : ‘भिंतीलाही कान असतात’ ही प्रचलीत म्हण प्रत्येकाच्या तोंडी आहे. मात्र, आपल्या डिव्हाईसलाही कान असतात, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण, आपण वापरत असलेले मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून आपला खासगी डेटा (private data) कंपन्यांच्या फायद्यासाठी विकला जातो आहे. पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल (personal data protection bill) संसदेमध्ये रखडले असल्याने नागरिकांचे खासगी आयुष्य चव्हाट्यावर येत आहे. (private things are now public due to data theft)

हेही वाचा: सेना, राष्ट्रवादींवर पटोलेंचे आरोप, नंतर घुमजाव; म्हणाले...

नुकतीच लिंक्डइन, व्हॉट्सॲप या सोशल मीडिया कंपन्या डेटा प्रायव्हसी वरून चर्चेमध्ये आहे. फेक कॉलच्या माध्यमातून बँकेतून परस्पर रोख काढल्याच्या बातम्या आपण आठवड्यातून एकदा तरी हमखास वाचतो. अनेकांना अशा फेक कॉलचा अनुभव आला असेल. तरुण नोकरीसाठी मिळविण्यासाठी विविध खासगी वेबसाइटवर आपली माहिती भरतात. मात्र, त्या विशिष्ट कंपनीतून फोन न येता खासगी मध्यस्थाचा फोन येतो. अशा वेळी आपला संपर्क क्रमांक त्यांना कसा मिळाला, हा प्रश्‍न मनामध्ये उपस्थित होतो.

''ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करताना आपण अशा कंपन्यांना आपल्या माहितीचा वापर करण्याची परवानगी देतो. आपण ही परवानगी त्या ॲप्लिकेशनच्या वापरापुरती दिली असते. अटींमध्ये देखील त्या माहितीचा वापर व्यावसायिक बाबीसाठी होणार नाही, असेच लिहिलेले असते. तरी देखील कवडीमोल भावामध्ये आपली खासगी माहिती कंपन्या विकतात. काही कंपन्यांच्या भल्यासाठी केंद्रशासन डेटा प्रोटेक्शन बील पास करीत नाही, असे यातून दिसते.''

-ॲड. डॉ. महेंद्र लिमये, सल्लागार, सायबर लॉ

..तर सायबर गुन्हे कमी होतील

फोनवर गुंतवून ठेवत आपल्याकडून इतर आवश्‍यक माहिती आणि ओटीपीसुद्धा मिळवून घेतात. सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सायबर गुन्हेगाराकडून वेबसाइटवर आणि ॲप्लिकेशनला दिलेल्या माहितीचाच आधार घेतला जातो. डेटा प्रायव्हसीबाबत संसदेमध्ये कायदा पास झाल्यास अशा गुन्हेगारांवर वचक राहील. शिवाय, आपला डेटा सुरक्षीत राहील.

चोरी पासून अशी घ्या काळजी -

  • वेबसाइटचा युआरएल तपासा

  • वेबसाइट लॉक असल्यास पुढे जा

  • ओटीपी न आल्यास रीफ्रेश करा

  • ऑर्डरबाबत टोल फ्री नंबरवरुनच संपर्क करा, डिलिव्हरी बॉयला थेट कॉल करू नका

  • फेसबुक पोस्टचा संशय आल्यास ब्लॉक ॲंड रिपोर्ट करा

loading image