जिल्ह्यात १६० मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन । nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen

नागपूर : जिल्ह्यात १६० मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन

नागपूर : कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनच्या संभावित धोका लक्षात घेता प्रशासनाने कंबर कसली असताना ऑक्सिजन उत्पादक कंपन्याही सज्ज झालेल्या आहेत. जिल्ह्यातील दहा ते १२ कारखान्यांची ऑक्सिजन उत्पादन करण्याची क्षमता सरासरी १६० ते २०० मेट्रिक टन आहे. त्यामुळे येणाऱ्या संभावित धोका लक्षात घेता येत्या काळात ऑक्सिजनची टंचाई जाणवणार नसल्याचा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला आहे.

कोरोना दुसऱ्या लाटेच्या वेळेस शहरच नव्हे तर राज्याला ऑक्सिजनच्या टंचाईला सामोरे जावे लागले होते. ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र, आता जिल्ह्यातील दहा ते १२ कारखान्यामधून प्रति दिन १६० मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती करण्याची क्षमता आहे. गरजेनुसार उत्पादन केले जाऊ शकते. मात्र, सध्या रुग्णालयाकडून ३० टक्केच ऑक्सिजनची मागणी होत आहे.

हेही वाचा: जळगाव : न्यायालयाचे मनपासह शासन- प्रशासनावर ताशेरे

उर्वरित ऑक्सिजन हे उद्योगांना पुरवठा केला जात आहे. भविष्यात दुसऱ्या लाटेसारखी स्थिती निर्माण झाल्यास ऑक्सिजन कारखाने सज्ज आहेत. कारण त्यावेळी असलेली मागणी आता होत असलेले उत्पादन यात मोठे अंतर आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असली तरी ऑक्सिजनची टंचाई निर्माण होण्याची शक्यता कमीच आहे. त्या स्थितीतही इतर राज्यांना आपण ऑक्सिजनचा पुरवठा करू शकेल अशी स्थिती आहे.

"हॉस्पिटलमध्ये सध्या उत्पादनाच्या तुलनेत ३० टक्केच ऑक्सिजनची मागणी आहे. उद्योगांमध्ये ७० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. कारखाने सध्या पूर्णक्षमतेने चालू असून १६० मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती केली जात आहे."

-संजय पझारे, संचालक, के.एस. एन्टरप्रायजेस

Web Title: Production Of 160 Metric Tons Of Oxygen The

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top