esakal | संशय अखेर ठरला खरा; कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या आकडेवारीतील घोळ सिद्ध
sakal

बोलून बातमी शोधा

Proves a mix of death statistics with corona infections

नवीन मृत्यू व बाधितांची संख्या सोडली तर आजपर्यंतच्या मृत्यूंत २७५, बाधितांमध्ये ७ हजार ३५७, करोनामुक्तांच्या संख्येत ७ हजार ७ रुग्णांची तफावत असल्याचे पुढे आले आहे. निदान आज पाठवण्यात आलेली आकडेवारी अचूक आहे का, असा सवाल जिल्हा शल्य चिकित्सक यांना विचारला जात आहे.

संशय अखेर ठरला खरा; कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या आकडेवारीतील घोळ सिद्ध

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचे भय दिवसेंदिवस वाढत होते. ११ मार्च रोजी पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर कोरोनाची प्रकोप सुरू झाला. जनसामान्यांच्या मनात भीती होती. ती खरी ठरली. मात्र, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत समन्वय नसल्यामुळे दर दिवसाला मिळणाऱ्या कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या आकड्यात घोळ असल्याची विचारणा करण्यात येत होती. अखेर आठ महिन्यांनंतर ३१ ऑक्टोबरला महापालिका आणि आरोग्य विभाग यांच्यात समन्वय नसल्याचे सिद्ध झाले.

शुक्रवार आणि शनिवारच्या आकडेवारीत एकाच दिवसात प्रचंड तफावत असल्याचे दिसून आले. बाधितांचा आकडा पाच हजारांनी वाढला तर मृत्यूचा आकडा तीनशेने वाढला असल्याचे पुढे आले. दर दिवसाला जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून कोरोनाबाधितांसह कोरोनामुक्त, मृत्यूसह जिल्ह्यात होणाऱ्या सर्व कोरोना चाचण्यांची यादी प्रकाशित केली जाते. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पाठविलेल्या ३० ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबरच्या अहवालात आकडेवारीमध्ये घोळ असल्याचे सिद्ध झाले.

अधिक माहितीसाठी - सहा वर्षीय चिमुकलीला कॅन्सरसारखा दुर्धर आजार; हतबल बापाचा मुलीला वाचविण्यासाठी संघर्ष

नवीन मृत्यू व बाधितांची संख्या सोडली तर आजपर्यंतच्या मृत्यूंत २७५, बाधितांमध्ये ७ हजार ३५७, करोनामुक्तांच्या संख्येत ७ हजार ७ रुग्णांची तफावत असल्याचे पुढे आले आहे. निदान आज पाठवण्यात आलेली आकडेवारी अचूक आहे का, असा सवाल जिल्हा शल्य चिकित्सक यांना विचारला जात आहे. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top