नागपूर - हुडकेश्वर ठाण्यात परिविक्षाधीन उपनिरीक्षकासह हेड कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. वडिलांचा अपघात झाल्याने त्यांच्या विम्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे देण्याच्या बदल्यात आठ हजाराची मागणी केली होती. .आकाश साकोरे (वय-२८) असे परिविक्षाधीन पोलिस उप निरीक्षक आणि शारदा सदाशिव भेरे (आलोटकर) अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार २९ वर्षीय मुलाच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वी हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाल्याने मृत्यू झाला होता..त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या विम्याच्या रकमेसाठी पोलिस रिपोर्टसह इतर महत्वाची कागदपत्रे त्यांना हवी होती. त्यासाठी ते वकीलासह ठाण्यात गेले होते. त्यावेळी तपास अधिकारी असलेले उपनिरीक्षक आकाश साकोरे यांनी त्यांना कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली. ते यासाठी शारदा भेरे यांनाही भेटले..वकीलासोबत आल्यावर ते कुठले ना कुठले कारण देत त्यांना परतवून लावत होते. त्यानंतर एक दिवस शारदा यांनी तक्रारदाराला एकटे येण्यास सांगितले. त्यानुसार तो ठाण्यात आल्यावर त्याला शारदा यांनी ८ हजाराची मागणी केली. त्यामुळे त्याने ‘एसीबी’ला तक्रार दिली.ठरल्याप्रमाणे उपअधीक्षक शुभांगी वानखडे, निरीक्षक रवींद्र सहारे, वैशाली आठवले, हेडकॉन्स्टेबल वंदना नगराळे, सरिता राऊत, अनिल बहिरे, अमोल मेंघरे आणि विजय सोळंके यांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात बुधवारी दुपारी सापळा रचला. पैसे दिल्यावर काही वेळात दोघांनाही पैशासह पथकाने रंगेहात अटक केली..या प्रकाराने हुडकेश्वर ठाण्यात एकच खळबळ उडाली. दोघेही हुडकेश्वर भागात राहात असून त्यांच्या घराची झडती घेण्यात येत आहे. दोघांविरूद्ध हुडकेश्वर पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पैसे घेताच वाटपशारदा यांनी तक्रारदाराकडून पैसे घेतल्यावर उपनिरीक्षकाचा त्यातील हिस्सा त्यांच्या सुपूर्द केला. त्यात उपनिरीक्षकाने सहा हजार तर शारदा यांनी दोन हजार रुपये घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून पैसे जप्त केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.